• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • फरहान अख्तरच्या चित्रपटात ‘मराठी’चं तुफान; अभिनेत्री मातृभाषेतच करणार संवाद

फरहान अख्तरच्या चित्रपटात ‘मराठी’चं तुफान; अभिनेत्री मातृभाषेतच करणार संवाद

आता ती फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) ‘तुफान’ (Toofaan) या बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हा चित्रपट हिंदी असला तरी मृणाल मात्र मराठीतच बोलणार आहे.

 • Share this:
  मुंबई 8 एप्रिल: मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) ही मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेल्या काही काळात ती मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या जबरदस्त अभिनयाचा जलवा दाखवत आहे. अलिकडेच ती ‘बाटला हाऊस’ आणि ‘सुपर 30’ सारख्या बिजेट चित्रपटांमध्ये झळकली होती. त्यानंतर आता ती फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) ‘तुफान’ (Toofaan) या बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हा चित्रपट हिंदी असला तरी मृणाल मात्र मराठीतच बोलणार आहे. (Marathi language) जाणून घेऊन या अनोख्या प्रयोगामागचं खरं कारण... ‘तुफान’ (Toofaan) या चित्रपटाच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत मृणालनं आपल्या व्यक्तिरेखेवर भाष्य केलं. या चित्रपटात ती प्रियांका ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्रियांका ही एक महाराष्ट्रीय मुलगी आहे त्यामुळं ती आपल्या मातृभाषेतच म्हणजेच मराठीत संभाषण करताना दिसणार आहे. अनेक चित्रपटांमध्ये मराठी व्यक्तिरेखा हिंदीमध्ये संवाद करताना दिसतात. अर्थात ती पटकथेची गरज असते. या चित्रपटात मात्र दिग्दर्शकानं एक नवा प्रयोग करण्याचं ठरवलं आहे. त्यांनी महाराष्ट्रीय व्यक्तिरेखांच्या तोंडी मराठी संवाद ठेवले आहेत. त्यामुळं चित्रपटात आणखी वास्तवदर्शी फिल येईल अशी विश्वास त्यांना आहे. अर्थात यामुळं मराठी प्रेक्षक मात्र खूश झाले आहेत. शिवाय एका हिंदी चित्रपटात मराठी भाषा ऐकण्यासाठी ते उत्सुक आहेत. अवश्य पाहा - VIDEO: आंतराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत झाला हंगामा; झटापटीत विजयी तरुणी झाली जखमी अवश्य पाहा - Saqib Salim मुलींचे कपडे घालून जायचा लग्नात; हुमा खुरेशीनं सांगितला भन्नाट किस्सा ‘तुफान’ (Toofaan) या चित्रपटासाठी फरहान अख्तरनं जबरदस्त मेहनत केली आहे. या चित्रपटात तो एका बॉक्सरच्या भूमिकेत झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. अन् हा ट्रेलर पाहून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आता आणखी उत्सुक झाले आहेत. या चित्रपटात फरहानसोबत परेश रावल, इशा तलवार, विजय राज, रविंद्र चावला यांसारखे अनक नामांकित कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यानं केलं आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: