मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: आंतराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत झाला हंगामा; झटापटीत विजयी तरुणी झाली जखमी

VIDEO: आंतराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत झाला हंगामा; झटापटीत विजयी तरुणी झाली जखमी

 या स्पर्धेतील सौंदर्यवतींनी विजयी मुकूट मिळवण्यासाठी चक्क हाणामारी केली. यादरम्यान एक सौंदर्यवती जखमी देखील झाली. (crown snatched from head)

या स्पर्धेतील सौंदर्यवतींनी विजयी मुकूट मिळवण्यासाठी चक्क हाणामारी केली. यादरम्यान एक सौंदर्यवती जखमी देखील झाली. (crown snatched from head)

या स्पर्धेतील सौंदर्यवतींनी विजयी मुकूट मिळवण्यासाठी चक्क हाणामारी केली. यादरम्यान एक सौंदर्यवती जखमी देखील झाली. (crown snatched from head)

मुंबई 8 एप्रिल: कुठलीही स्पर्धा म्हटलं की स्पर्धकांमध्ये चुरस ही आलीच. अनेकदा या चुरशीचं रुपांतर वाद-विवादांमध्येही होतं. अन् यामुळं संपूर्ण स्पर्धाच वादाच्या भोवऱ्यात अडकते. असाच काहीसा प्रकार यावेळी चक्क एका आंतराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेमध्ये घडला आहे. (Mrs Sri Lanka beauty queens) या स्पर्धेतील सौंदर्यवतींनी विजयी मुकूट मिळवण्यासाठी चक्क हाणामारी केली. यादरम्यान एक सौंदर्यवती जखमी देखील झाली. (crown snatched from head) या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.

प्रकरण नेमकं आहे तरी काय?

हा धक्कादायक प्रकार घडला यंदाच्या मिस श्रीलंका सौंदर्य स्पर्धेत. (Mrs Sri Lanka beauty queens) या स्पर्धेत पुष्पिका डिसिल्वा हिनं विजयी मुकूटावर आपलं नाव कोरलं. तिला मिस श्रीलंका या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मात्र परिक्षकांचा हा निर्णय गतविजेती कॅरोलिन जूरी हिला आवडला नाही. तिनं थेट पुष्पिकाच्या डोक्यावरील मुकूट हिसकावून घेतला. क्षणार्धात घडलेल्या या प्रकारामुळं सर्वच जण आश्चर्यचकित झाले. या दरम्यान पुष्पिकाच्या डोक्याला जखम देखील झाली. परिणामी ती रडतरडत तेथून निघून गेली. हा धक्कादायक प्रकार तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी आपल्या कॅमेरात कैद केला. हा व्हिडीओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे. सध्या कॅरोलिनावर जोरदार टीका केली जात आहे.

अवश्य पाहा - साकिब सलीम मुलींचे कपडे घालून जायचा लग्नात; हुमा खुरेशीनं सांगितला भन्नाट किस्सा

" isDesktop="true" id="538118" >

अवश्य पाहा - कामासाठी स्टुडिओसमोर तासंतास बसायचा; आमिरमुळं बदललं अमित त्रिवेदीचं आयुष्य

पुष्पिका घटस्फोटित आहे त्यामुळं तिला हा पुरस्कार देऊन परिक्षक चुकिच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देत आहेत असा आरोप कॅरोलिनानं केला. मात्र या आरोपावर पुष्पिकानं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. “माझा घटस्फोट झालेला नाही. मी केवळ पतीपासून वेगळी राहत आहे. माझ्या मुलांचा सांभाळ मी एकटीने करते. आज माझ्यासारख्या अशा कितीतरी महिला श्रीलंकेत आहेत. त्यांना देखील माझ्यासारखाच त्रास सहन करावा लागतो. या कार्यक्रमात माझ्यासोबत जे घडले ते खरंच खूप अपमानास्पद होते.” अशी प्रतिक्रिया तिनं दिली.

First published:

Tags: Beauty queen, Entertainment, Sri lanka