जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / वेड्या आईची वेडी माया..! उत्कर्ष शिंदेला टीव्हावर गाताना पाहून आईनं केलं असं काही, Video Viral

वेड्या आईची वेडी माया..! उत्कर्ष शिंदेला टीव्हावर गाताना पाहून आईनं केलं असं काही, Video Viral

utkarsh shinde

utkarsh shinde

अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेनं देखील त्याच्या आईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल की, वेड्या आईची वेडी माय..सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 मे- प्रत्येक आईला आपल्या मुलाचं कौतुक हे असतचं. मुलांच्या डोळ्यात प्रत्येक आई आपलं जग पाहतं असते. आज मातृदिन आहे, यानिमित्त मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलेब्सनी आईसोबतच्या काही खास आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेनं देखील त्याच्या आईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल की, वेड्या आईची वेडी माय..सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्कर्ष शिंदेनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यानं म्हटलं आहे की, “आईची माया वेडी“ असते असे म्हणतात.पण त्या वेड्या माये समोर मोठ्यातमोठा नतमस्तक होतो.ह्या व्हिडिओत माझी आई सौ विजया आनंद शिंदे तिच्या उत्कर्ष, आदर्शला एकत्र टीव्ही वर परफॉर्मकरताना बघून मायेनी औक्षण करतीये, ओवाळतीये. वाचा- मराठी कलाकारांच्या ‘सुपरमॉम’: या सेलिब्रेटींचं आईसोबत आहे खास बॉंडिंग स्वारसम्राट प्रल्हाद शिंदेची सून ,महागायक आनंद शिंदेंची पत्नी.आणि आता आमची आई . स्टारडम lने तीनपिढ्या पाहिलं पण तिला जास्त कौतुक तिच्या मुलांचं .इतक्या थोर गायकाची सून इतक्या मोठ्या गायकाची बायको तरीही साधेपणाने सैदववावरणारी.मुलांना घडविण्यात आयुष घालवणारी माझी आई. जिच्या मुळे आज मी डॉक्टर एक्टर सिंगर राइटर संगीतकार बनू शकलो. टीव्ही वर मुलानं पाहून ओवाळणारी माझ्या ह्या भोळ्या आई वरुन माझं आयुष मी 100 वेळेस ओवाळून टाकेन.लव्ह यू मम्मी.

News18लोकमत
News18लोकमत

उत्कर्ष शिंदे बिग बॉस मराठीमुळे महाराष्ट्राच्या घराघऱात पोहचला. उत्कर्ष लवकरच महेश मांजेरकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमासाठी तो तुफान मेहनत करताना दिसत आहे. या सिनेमासाठी त्याने खास बॉडी बनवली आहे. अनेकदा तो जीमचे व्हिडिओ पोस्ट करत असतो.

जाहिरात

स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा मावळे यांच्या पराक्रमावर आधारित वेडात मराठे वीर दौडले सात हा मराठीतील बिग बजेट सिनेमा आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून सिनेमा चर्चेत आहे. सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता अक्षय कुमार दिसणार आहे. दरम्यान यावरून वाद ही निर्माण झाला होता. अक्षय कुमारला ट्रोल देखील करण्यात आलं होतं. मात्र सिनेमाचं शुटींगही आता सुरू झालं आहे.सिनेमात अभिनेता हार्दीक जोशी, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे,प्रविण तरडे, विराट मडके, जय दुधाणे हे कलाकार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात