आज सर्वत्र जागतिक मातृदिन अर्थातच मदर्स डे साजरा केला जात आहे. आयुष्यभर आपल्यासाठी झटणाऱ्या त्या देवरुपी आईचे आभार मानण्याची खास संधी. आज आम्ही तुम्हाला मराठी कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील सुपरमॉमची झलक दाखवणार आहोत.
स्वप्नील जोशी तर अभिनेता असूनसुद्धा आजही आपल्या आईबाबांच्या धाकात राहतो. आजही तो प्रत्येक खर्चाचा हिशोब त्यांना देत असतो.
विराजस कुलकर्णीबाबत सांगायचं तर तो लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णींचा मुलगा आहे. या मायलेकाची जोडी फारच लोकप्रिय आहे.