सुनिल ग्रोवरच्या घरात माकडाने केली चोरी; लांबवला दह्याचा डब्बा, तो मात्र VIDEO करण्यात दंग

सुनिल ग्रोवरच्या घरात माकडाने केली चोरी; लांबवला दह्याचा डब्बा, तो मात्र VIDEO करण्यात दंग

Monkey Theft Curd: सुनिल ग्रोवरच्या (Sunil Grover) घरात एका माकडाने चोरी केली आहे. माकडाने स्वयंपाक घरातील दह्याचा डब्बा हातोहात लांबवला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 07 मार्च: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अप्रतिम विनोदी अभिनयासाठी (Comedy Actor) सुनिल ग्रोवरला (Sunil Grover) ओळखलं जातं. तो केवळ मनोरंजन विश्वातच नाही तर सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. अलीकडेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल (Viral Video) होतं आहे. एका माकडाने सुनिल ग्रोवरच्या घरात चोरी केली (Monkey Theft Curd) असून स्वयंपाक घरातील दह्याचा डब्बा (Curd) हातोहात लांबवला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक माकड सुनिल ग्रोवर यांच्या स्वयंपाकघरात डोकावताना दिसत आहे. यानंतर माकडाने चलाखीने दह्याच्या डब्यावर डल्ला मारला आहे. यावेळी सुनील ग्रोवर या व्हिडिओचं चित्रीकरण करण्यात व्यग्र होता. या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला आवाज आला की, माकड दही घेऊन पळाला. हा व्हिडिओ शेअर करताना सुनील ग्रोवरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की - 'दही घेवून पळाला.'

हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांतचं हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. आतापर्यंत इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर जवळपास एक लाख लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. अनेक नेटकरी या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

हे ही वाचा -देशी नवाजुद्दीनचा VIDEO VIRAL; पोलिसांना फोन करुन म्हणतोय, 'मला घेऊन जा...'

गेल्या काही दिवसांपासून सुनील ग्रोवर कपिल शर्मासोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. अलीकडेच सुनील ग्रोवरने एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ पाहून असा अंदाज बांधला जात होता, की सुनिल ग्रोवर लवकरच पुन्हा एकदा 'द कपिल शर्मा शो'चा भाग होऊ शकेल. पण सुनिल ग्रोवरकडून याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलं गेलं नाही. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात सामंजस्य करण्यासाठी सलमान खान प्रयत्न करीत असल्याच्या अनेक बातम्या यापूर्वी समोर आल्या आहेत.

Published by: News18 Desk
First published: March 7, 2021, 9:15 PM IST

ताज्या बातम्या