जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / देशी नवाजुद्दीनचा VIDEO VIRAL; पोलिसांना फोन करुन म्हणतोय, 'मला घेऊन जा...'

देशी नवाजुद्दीनचा VIDEO VIRAL; पोलिसांना फोन करुन म्हणतोय, 'मला घेऊन जा...'

देशी नवाजुद्दीनचा VIDEO VIRAL; पोलिसांना फोन करुन म्हणतोय, 'मला घेऊन जा...'

सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 6 मार्च : सोशल मीडियावर (Social Media) एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Video Viral) हा व्हिडिओ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचे सल्लागार आणि भारतीय जनता पार्टीचे (उत्तर प्रदेश) प्रवक्ता शलभ मणी त्रिपाठी (Shalabh Mani Tripathi) यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘भेटा @Nawazuddin_S यांच्यासारख्या दिसणार या व्यक्तीशी @112 नेहमी आपल्या सेवेत तत्पर’. निमुळत्या चेहऱ्याचा आणि हलकी दाढी असलेली ही व्यक्ती काहीशी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीसारखी दिसत आहे. पहिल्याच नजरेत ही व्यक्ती काहीशी नवाजुद्दीन सारखी वाटत असली तरी पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नेमका प्रकार समोर येतो. या व्हिडिओमधील व्यक्ती दारुच्या नशेत आहे. दारुच्या नशेत त्याने तीन ते चार वेळा पीसीआरला कॉल केला आणि या व्यक्तीच्या कॉलवर पोलीस कर्मचारीही तेथे पाहोचले. पोलिसांनी जेव्हा त्या व्यक्तीला फोन करण्याचं कारण विचारलं तर सर्वजण हैराण झाले. तो पोलिसांना ठाण्यात बंद करण्याची मागणी करीत होता. दारुचं व्यसन सोडविण्यासाठी तो तुरुंगात घेऊन चला, असा सांगत होता. यावर पोलिसांनी त्या व्यक्तीला विचारलं की, पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तुझं दारुचं व्यसन जाईल, यावर ती व्यक्ती म्हणाली की, तिथे तर मला दारु प्यायलाच मिळणार नाही.

जाहिरात

हे ही वाचा- नवाज आणि आलिया पुन्हा आले एकत्र; घटस्फोटाचा निर्णय घेतला मागे, कारण… पोलिसांनी जेव्हा त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठविणार असल्याचं सांगितलं, तेव्हा त्याने विरोध केला. त्याचं म्हणणं आहे की, पोलीस ठाण्यात मोठे अधिकारी असतात. 10-12 दिवस जर त्याला तिथं ठेवण्यात आलं तर त्याचं दारुचं व्यसन सुटेल असा विश्वास वाटतो. पोलीस ठाण्यात गेल्यावर दारुचं व्यसन सुटेल का? असं विचारल्यावर ती व्यक्ती होय उत्तर देते. कारण तिथं प्यायला मिळणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात