मुंबई, 20 जून : सध्या बॉक्स ऑफिसवर साऊथ सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळतोय. 100 कोटींची कमाई कोण करणार यासाठी शर्यत पाहायला मिळतेय. साऊथ सिनेसृष्टीत एकाहून एक सुपरस्टार कलाकार आहेत. त्यातील सुपरस्टार मोहनलाल यांनी आपल्या अभिनयानं साऊथ सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं. अभिनेता आजच्या घडीला 63 वर्षांचा आहे. मात्र तरिही ते इंडस्ट्रीत सक्रीय असून बिग बजेट सिनेमांमध्ये काम करत आहेत. त्यांचा प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतोय. त्यांच्या नावावर असलेला असा एक रेकॉर्ड आहे जो आजवर कोणीही तोडू शकला नाहीये. मोहनलाल यांचा ‘मरक्कर : द लायन ऑफ द अरेबियन सी’ हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल किंवा याबद्दल तुम्हाला माहिती असेल. हा सिनेमा देशातील पहिला सिनेमा आहे ज्याने रिलीजच्या आधीच 100 कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड रचला आहे. 2021मध्ये अभिनेते मोहनलाल यांचा ‘मरक्कर : द लायन ऑफ द अरेबियन सी’ हा सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला. सिनेमाचं मोठ्या प्रमाणात अँडवान्स बुकींग झालं होतं. ‘मरक्कर : द लायन ऑफ द अरेबियन सी’ हा देशातील पहिला सिनेमा ज्याने अँडवान्स बुकींग करत 100 कोटी रुपये कमावले होते. हेही वाचा - Adipurush साठी प्रभास नव्हती पसंती; बॉलिवूडच्या ‘या’ 6 पॅक्स अभिनेत्याला होती रामाच्या भुमिकेसाठी ऑफर मधल्या काळात एसएस राजमौली यांचा आरआरआर असो किंवा शाहरूख खानचा पठाण आता आलेला प्रभासचा आदिपुरूष किंवा पोन्नियिन सेल्वन 2 सारख्या अनेक सिनेमाना मोहनलाल यांच्या ‘मरक्कर : द लायन ऑफ द अरेबियन सी’ सिनेमानं मागे टाकलं. या सिनेमांनी रिलीजनंतर चिक्कार कमाई केली. पण ‘मरक्कर : द लायन ऑफ द अरेबियन सी’ने रिलीज आधीच आपल्या नावाचा डंका बॉक्स ऑफिसवर वाजवला होता.
‘मरक्कर : द लायन ऑफ द अरेबियन सी’ हा सिनेमा 16 व्या जगातील बॅकड्रॉपवर तयार झालेला सिनेमा आहे. एक पीरियड ड्रामा यात पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन याने सिनेमाचं दिग्दर्शक केलं आहे. ‘मरक्कर : द लायन ऑफ द अरेबियन सी’ हा मल्याळममधील सर्वात महागडा सिनेमा असून या सिनेमा अभिनेते मोहनलाल यांच्यासह अभिनेत्री कीर्ती सुरेश, अर्जुन सरला, सुनील शेट्टी, प्रणव मोहनलाल, मंजू वारिय सारखे प्रसिद्ध कलाकार आहेत. सिनेमानं रिलीज आधी 100 कोटींची कमाई केली असली तरी रिलीजनंतर मात्र सिनेमा काही खास कमाई करू शकला नाही.