आदिपुरूषचा दिग्दर्शक ओम राऊतनं सिनेमात रामाच्या भुमिकेसाठी प्रभासला फायनल केला नव्हतं. बॉलिवूडच्या हँडसम हंक अभिनेत्याला घेण्याचा ओम राऊतचा विचार होता.
तान्हाजी: द अनसंग वॉरियर नंतर ओम राऊतकडे बरेच सिनेमे होते. त्यातील आदिपुरूष हा एक सिनेमा होता. सिनेमासाठी त्याचं कास्टिंग सुरू होतं. आणि पहिलं नाव त्यानं ऋतिक रोशनचं घेतलं होतं.
आदिपुरूषमध्ये रामाच्या भुमिकेसाठी ऋतिक रोशन ओम राऊतची पहिली पसंती होती. पण ऋतिकनं सिनेमासाठी त्याची सहमतीही दर्शवली नाही तसंच मला विचार करायला वेळ हवा आहे असं सांगितलं देखील नाही. त्यानंतर ओम राऊतनं प्रभासला सिनेमासाठी विचारलं आणि तो लगेच रामाची भुमिका साकारण्यासाठी तयार झाला.
पाहायला गेलं तर रामाच्या भुमिकेत प्रभास फारसा फिट बसत नाहीये. ऋतिकला जेव्हा आदिपुरूषसाठी विचारलं तेव्हा दंगल आणि छिछोरे फेम नितेश तिवारी देखील एपिक रिटेलिंग सिनेमासाठी तयारी करत होते. तेव्हा त्यांनीही ऋतिकला भूमिकेसाठी विचारलं होतं.
पण ऋतिकने नितेश तिवारीच्या रामायण प्रोजेक्टसाठीही सहमती दिली नाही. ऋतिक जर ओम राऊतच्या आदिपुरूषला हो म्हटला असता तर आज आदिपुरूषच्या वादात अडकला असता. सिनेमामुळे आज प्रभाससारख्या अभिनेत्याला इमेज खराब होण्याची वेळ आली आणि यात ऋतिकची देखील अशीच अवस्था झाली असती.
प्रभासप्रमाणेच अभिनेत्री कृती सेनन देखील सीतेच्या भुमिकेसाठी ओम राऊतची पहिली पसंती नव्हती. ओमने याआधी अभिनेत्री अनुष्का शर्मा, अनुष्का शेट्टी, कीर्ती सुरेश, कियारा अडवाणी या अभिनेत्रींना विचारणा केली होती. मात्र सगळ्यांनी सिनेमाला नकार दिला.