Home /News /entertainment /

'तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा...' साजिद खानवर मॉडेलचा लैंगिक शोषणाचा आरोप

'तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा...' साजिद खानवर मॉडेलचा लैंगिक शोषणाचा आरोप

एका मॉडेलने केलेल्या आरोपामुळे दिग्दर्शक निर्माता साजिद खान (Sajid Khan) अडचणीत सापडला आहे. पॉला नावाच्या एका मॉडेलने साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

  मुंबई, 11 सप्टेंबर : एका मॉडेलने केलेल्या आरोपामुळे दिग्दर्शक निर्माता साजिद खान (Sajid Khan) अडचणीत सापडला आहे. पॉला नावाच्या एका मॉडेलने साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. 'लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपण्याआधी मी बोलणे आवश्यक आहे', असे म्हणत या मॉडेलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या मॉडेलने तिच्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'जेव्हा #metoo चळवळ सुरू झाली, अनेकांनी साजिद खानबाबत भाष्य केले पण अनेक कलाकारांप्रमाणेच माझाही कुणी गॉडफादर नव्हता त्यामुळे माझी हिंमत झाली नाही. आणि कुटुंबासाठी मला कमवायचे होते म्हणून मी शांत राहिले. आता माझ्याबरोबर माझे पालक नाही आहेत, मी माझ्यासाठी कमावते. त्यामुळे मी हे सांगायची हिंमत करू शकते की, वयाच्या 17 व्या वर्षी साजिद खानने मला त्रास दिला होता.' (हे वाचा-48 कोटींचं फक्त ऑफिस; अशा कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे क्वीन 'कंगना') तिने गंभीर आरोप करत पुढे असे म्हटले आहे की, 'तो माझ्याशी अश्लील बोलायचा, मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. एवढेच नव्हे तर त्याने आगामी हाऊसफुल्ल सिनेमात काम करण्यासाठी त्याच्यासमोर कपडे उतरावे लागतील असेही म्हटले होते.'
  View this post on Instagram

  🙏🏼 Before democracy dies and there is no freedom of speech anymore I thought I should speak !

  A post shared by Dimple paul (@paulaa__official) on

  तिने ही पोस्ट शेअर करताना अशी शंका उपस्थित केली आहे की, त्याने अशाप्रकारची वागणूक आणखी कुणाला दिली असेल का? पॉलाने असे म्हटले आहे की लहान असल्यामुळे या घटनेचा तिच्यावर मोठा परिणाम झाला होता. तिने त्याच्या अटकेची मागणी करत असे म्हटले आहे की, 'केवळ कास्टिंग काऊचसाठी नाही तर तुमच्या स्वप्न हिसकावून घेतल्यामुळे असे नराधम गजाआड असले पाहिजेत. मी थांबले नाही पण मी त्याबद्दल न बोलून चूक केली'. (हे वाचा-फरहानच्या गर्लफ्रेंडवर Gold Digger असल्याचा आरोप, तिच्या Wikipediaमध्ये छेडछाड) दरम्यान मॉडेलच्या या मागणीनंतर सोशल मीडियावर साजिद खानला ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या अटकेची मागणी केली जात आहे. #ArrestSajidKhan असा हॅशटॅग देखील ट्रेन्ड होत आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Bollywood, Sajid khan

  पुढील बातम्या