मुंबई, 14 नोव्हेंबर : बॉलिवूडमध्ये 80 ते 90 च्या दशकांतील सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत डान्सर मिथुन चक्रवर्तीचं नाव आल्याशिवाय राहत नाही. त्याची ड्रेस स्टाइल, केसांची स्टाइल, त्याच्या डान्सस्टेप यासाठी आज चाळीशीत असलेली मुलं वेडी आहेत. आता मिथुन चक्रवर्ती या वयातही अनेक सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसतात. अलीकडेच ते ‘द कश्मीर फाईल्स’ या बहुचर्चित चित्रपटात झळकले होते. त्यासोबतच ते राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत. आता मिथुनच्या चाहत्यांना नेहमीच त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडतं. आता मिथुन चक्रवर्तीनी एका मराठमोळ्या अभिनेत्रीला लग्नासाठी पळून जाण्यासाठी मदत केली होती. त्याविषयी त्यांनी एवढ्या वर्षांनंतर खुलासा केला आहे. बॉलिवूडचा सदाबहार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी एके काळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी छोट्या छोट्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. नुकतीच मिथुन यांनी ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या सोबत असलेल्या मैत्रीबद्दल खुलासा केला. एवढंच काय तर पद्मिनी यांना पळून जाऊन निर्माता प्रदीप शर्मा यांच्याशी लग्न करता यावं म्हणून मिथून यांनी पोटदुखीचं नाटकही केलं होतं. हेही वाचा - Akshay Kumar: ‘एवढ्या दिवसात तर अक्षय कुमार…’; RRRच्या शुटींगवरून राम चरणनं उडवली अक्षयची खिल्ली याविषयी बोलताना मिथुन म्हणाले, ‘कोणाला माहीत नाही, पण आमच्या शूटिंगच्या दिवशी मी पद्मिनीचं लग्न लावण्यासाठी मदत केली होतं. खरं तर सगळ्यांसमोर पोटदुखीचं नाटक केलं म्हणून ती पळून गेली. ती लग्न करून परत येऊ शकेल म्हणून मी असं केल. मी त्यांना पळून जाण्यास मदत केली. त्या दिवशी ती परत येईपर्यंत मी पोटात दुखत असल्याचे नाटक करत राहिलो.त्यामुळे शूटिंग लांबणीवर पडलं आणि ती पळून गेल्याच कोणाच्या लक्षातही नाही आलं. ही गोष्ट आजपर्यंत कुणालाच सांगितली नव्हती.’’
मिथुन आणि पद्मिनी दोघेही 33 वर्षांनंतर सिंगिंग रिअॅलिटी शोच्या सेटवर एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या भूतकाळातील अनेक गोष्टीं प्रेक्षकांसोबत शेअर केल्या. पद्मिनी यांनी त्या दोघांचे टॉम आणि जेरीचे नाते कसे होते आणि ते अनेकदा कसे भांडायचे याचा खुलासा केला. आता त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी हा सांगितलेला किस्सा ऐकून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर हेते यावर्षीच्या सर्वात हीट अशा ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटात झळकले होते. हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला तसंच मिथुन यांच्या कामाचंही कौतुक झालं. आता मिथुनच्या आगामी चित्रपटाबद्दल सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे. याचं नाव अजून ठरलं नसलं तरी याचा फर्स्ट लूक नुकताचा प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात मिथुन बरोबर दशक गाजवणारे सनी देओल, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ हे सुपरस्टारही झळकणार आहेत. या वयातही त्यांचा हा उत्साह पाहून चाहत्यांना प्रेरणा मिळते.

)







