जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मिथुन चक्रवर्तीच्या वडिलांचं मुंबईमध्ये निधन, लॉकडाऊनमुळे बंगळुरूमध्ये अडकला अभिनेता

मिथुन चक्रवर्तीच्या वडिलांचं मुंबईमध्ये निधन, लॉकडाऊनमुळे बंगळुरूमध्ये अडकला अभिनेता

मिथुन चक्रवर्तीच्या वडिलांचं मुंबईमध्ये निधन, लॉकडाऊनमुळे बंगळुरूमध्ये अडकला अभिनेता

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचे वडील बसंत कुमार चक्रवर्ती यांचं मुंबईमध्ये निधन झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 एप्रिल : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचे वडील बसंत कुमार चक्रवर्ती यांचं मुंबईमध्ये निधन झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार बसंत कुमार चक्रवर्ती मागच्या बऱ्याच वर्षांपासून आजारी होते. त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत शेवटचा श्वास घेतला. ते 95 वर्षांचे होते. किडनी निकामी झाल्यानं त्यांच्या मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. अशात अभिनेता मिथुन चक्रवर्ती मात्र लॉकडाऊनमुळे बंगळुरूमध्ये अडकले आहेत. ते मुंबईला परतण्याचा प्रयत्न करत आहेत असंही म्हटलं जात आहे. दरम्यान एका सिनेमाच्या शूटिंगसाठी ते बंगळुरूला गेले होते आणि लॉकडाऊनमुळे तिथेच अडकले आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी स्वतः या वृत्ताची पुष्टी केलेली नाही. मात्र टाइम्स ऑफ इंडिया नं याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे. या वृत्तानुसार 21 एप्रिलला बसंत कुमार चक्रवर्ती यांचं मुंबईमध्ये निधन झालं. एकीकडे मिथुन चक्रवर्ती बंगळुरूमध्ये अडकले आहेततर दुसरीकडे त्यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती मात्र मुंबईमध्ये आहे.

जाहिरात

याशिवाय प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रितुपर्णा सेन हिनं मिथुन चक्रवर्ती यांच्या वडीलांच्या निधनाबाबत ट्वीट केलं आहे. तिनं लिहिलं, मिथुन दा तुमच्या वडिलांच्या निधनावर माझी श्रद्धांजली. खंबीर राहा, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांति देवो. बसंत कुमार Calcutta Telephones चे इप्लॉई होते. त्यांना चार मुलं आहेत. ज्यात गौरांग म्हणजेच मिथुन चक्रवर्ती सर्वांत मोठे आहेत. (संपादन : मेघा जेठे.) लॉकडाऊनमध्येही सलमानचे वडील वॉकसाठी जातात बाहेर, म्हणाले- मी एकटाच नाही… Lockdown दरम्यान टायगर-दिशा राहतायत लिव्ह इनमध्ये? कृष्णा श्रॉफनं सांगितलं सत्य ‘माझ्या पत्नीला पाहून त्यानं मास्टरबेट केलं’ अभिनेत्याचं ट्वीट झालं होतं व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात