मुंबई, 22 एप्रिल : लॉकडाऊनमुळे सध्या टीव्हीवर रामायण आणि महाभारत या कार्यक्रमांची चलती आहे. या कार्यक्रमातील अनेक कलाकारांच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. अशात एका महाभारत कलाकाराचा वाढिदवस सुद्धा आहे. हा अभिनेता आहे सुमित राघवन. आज सुमितचा 49 वाढदिवस आहे. त्याच्या जन्म 22 एप्रिल 1971 ला झाला होता. सुमितनं त्याच्या करियरची सुरुवात महाभारत या टीव्ही शोमधून केली होती. ज्यात त्यानं बाल सुदामाची भूमिका साकारली होती.
सुमित राघवननं पुढे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानं 'हद कर दी आपने', 'शादी नंबर 1' या सिनेमात काम केलं. त्याला या सिनेमातून म्हणवं तसं यश मिळालं नाही. मात्र 2004 ते 2006 दरम्यान रिलीज झालेल्या साराभाई वर्सेज साराभाईमधून त्याला स्वतःची वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर त्यानं 'झलक दिखला जा सीजन 4' होस्ट केला. यानंतर तो पुन्हा एकदा 'साराभाई वर्सेज साराभाई टेक 2' मध्ये सुद्धा दिसला.
न्यूड फोटोंवर तिने दिलं स्पष्टीकरण, VIDEO शेअर करत म्हणाली,'माझ्यात दैवी शक्ती'
सुमितनं दोन वर्षांपूर्वी एक ट्वीट केलं होतं ज्यामुळे तो बराच चर्चेत राहिला होता. जेव्हाही सुमितचं नाव घेतलं जातं तेव्हा त्याच्या त्या ट्वीटची चर्चा होतेच. त्यानं 2 वर्षांपूर्वी त्याच्या ट्विटरवर एक ट्वीट करत त्याच्या पत्नीसोबत झालेल्या हॅरेसमेंट बद्दल सांगितलं होतं.
सुमितनं त्याच्या ट्वीटमधून सांगितलं होतं की, त्याची पत्नी आणि अभिनेत्री चिन्मयी सुर्वे मुंबईच्या विलेपार्ले भागात होती. त्यावेळी एका सफेद बीएमडब्ल्यू कारमध्ये बसलेल्या आणि ग्रे कलरचे कपडे घातलेल्या एका व्यक्तीनं तिच्यासमोरच मास्टबेट करायला सुरुवात केली होती. ज्यामुळे त्याची पत्नी खूप घाबरली होती.
दुबईमध्ये अडकलेल्या सोनू निगमच्या अटकेची मागणी,'अजान'बाबत वादग्रस्त ट्वीट VIRAL
A white BMW with last 4 digits 1985 needs to be traced. The driver wearing a grey safari who had parked near #ParleTilakSchool #VileParleEast started masturbating in front of my wife. Before she could slap him he escaped. She could note down just the last 4 digits@MumbaiPolice
— Sumeet (@sumrag) February 19, 2018
सुमितनं ट्विटरवरुन पोलिसांची मदत मागत त्या व्यक्तीच्या गाडीची डिटेल्स दिले होते. त्यानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यानं ही खूपच घृणास्पद कृती असल्याचं म्हटलं होतं. सुमित म्हणाला, ती दुपारची वेळ होती, मी घरी होतो आणि चिन्मयीनं मला घाबरलेल्या अवस्थेत कॉल करुन मला ही गोष्ट सांगितली होती. सुमित तक्रार दाखल केल्यानंतर त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती.
(संपादन : मेघा जेठे.)
सिंबा, सिंघम, सूर्यवंशी नव्हे कोरोनासाठी झटणाऱ्या रिअल हिरोंना रोहितची सुंदर भेट