मुंबई, 22 एप्रिल : कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवला आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वांनाच अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेक मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर काहींना त्यांच्या आरोग्याशी तडजोड करावी लागत आहे. सरकार सर्वांना घरी राहण्याचं आवाहन करत आहे. पण अशात लॉकडाऊन असतानाही सलमान खानचे वडील सलीम खान वॉकसाठी बाहेर जात असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोशल मीडियावर मागच्या काही दिवसापासून सलीम खान वॉकसाठी बाहेर जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशात नुकत्याच एका मुलाखतीत सलीम खान यांनी स्वतः याबाबचा खुलासा करत करत आपण बाहेर वॉकसाठी जात असल्याचं मान्य केलं आहे आणि यासोबत त्यांनी यामागचं कारण सुद्धा स्पष्ट केलं आहे. ‘माझ्या पत्नीला पाहून त्यानं मास्टरबेट केलं’ अभिनेत्याचं ट्वीट झालं होतं व्हायरल
पिंकव्हिलाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलीम खान म्हणाले, मला कंबरदुखी समस्या आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मला वॉक चालू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मी मागच्या 40 वर्षांपासून रोज चालण्यासाठी जातो. मी हे अचानक सोडून दिलं तर त्याचा परिणाम माझ्या आरोग्यावर होईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे मी सरकारकडून याची परवानगी देणारा पास घेतला आहे आणि मी सर्व नियमांचं पालन करत आहे. लॉकडाऊनच्या प्रेमात आहे ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री,शेअर केला बिकिनीतील फोटो
सलीम खान पुढे म्हणाले, मी केवळ मेडिकल ग्राउंडमुळेच बाहेर पडतो आणि असं करणारा मी एकमेव व्यक्ती नाही. त्या ठिकाणी अनेक लोक त्यांच्या प्राण्यांना फिरवण्यासाठी घेऊन आलेले मी रोज पाहतो. मात्र त्यांची तक्रार कोणीही करत नाही. सरकारनं घालून दिलेल्या प्रत्येक नियमाचं मी पालन करत आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्वही असं करत असाल. (संपादन : मेघा जेठे.) न्यूड फोटोंवर तिने दिलं स्पष्टीकरण, VIDEO शेअर करत म्हणाली,‘माझ्यात दैवी शक्ती’