मुंबई, 17 जून : चित्रपटांमध्ये बहुतेकवेळा लव्हस्टोरीचा शेवट हा नेहमीच आनंदी दाखवला जातो. पण खऱ्या आयुष्यात हा शेवट अनेकदा सुखकारक नसतो. ७०-८० च्या दशकात अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारा अभिनेता होता ज्याला पहिल्याच चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अल्पावधीतच तो खूप हिट झाला. पण त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र चांगलंच वादळ आलं. हा अभिनेता होता बॉलिवूडचा डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती. मिथुन चक्रवर्ती त्याच्या चित्रपटांसाठी तसेच प्रेमकहाणी साठी देखील चर्चेत राहिले. मिथुनची पहिली पत्नी देखील अभिनेत्री होती, पण घटस्फोटानंतर तिने इंडस्ट्री देखील सोडली आणि परदेशात राहू लागली. बॉलीवूडमध्ये ‘मृगया’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी ७०-८० च्या दशकात असे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले, ज्याला कोणीही विसरू शकणार नाही. लोक त्यांची दुसरी पत्नी योगिता बाली यांना ओळखतात, पण पहिल्या पत्नीचे नाव कदाचित कोणाला आठवत नसेल. त्याच्या पहिल्या पत्नीशी त्याचे नाते फक्त 4 महिने टिकू शकले. त्याची पहिली पत्नी आता हे लग्न एक स्वप्न मानते. घटस्फोटानंतर अभिनेत्याच्या तुटलेल्या नात्याबद्दल तो काय म्हणाला होता हेही आज आपण जाणून घेऊया.
मिथुनच्या पहिल्या पत्नीचे नाव हेलेना ल्यूक आहे. ती परदेशी मॉडेल होती. योगिता बालीच्या प्रेमात वेडे होण्यापूर्वी मिथुन तिच्या प्रेमात पडला होता. चित्रपटांमध्ये काम करताना मिथुन आणि हेलेना ल्यूकशी भेट झाली होती. हेलेनाने ‘आओ प्यार करीन’, ‘दो गुलाब’ आणि ‘साथ-साथ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. पहिल्या भेटीत मिथुन तिच्या सौंदर्यावर भाळला होता. मैत्रीनंतर दोघे प्रेमात पडले आणि दोघांनी 1979 मध्ये पुन्हा लग्न केले, परंतु लग्नाच्या 4 महिन्यांनंतरच मिथुन चक्रवर्ती आणि हेलेना ल्यूक वेगळे झाले. लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यांनंतर त्यांनी घटस्फोट घेऊन हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर हेलेना ल्यूकने एका मुलाखतीत अनेक धक्कादायक दावे केले होते. ती म्हणाली होती की, ‘हे लग्न झालं नसतं तर खूप चांगलं झालं असतं. मिथुननेच माझे ब्रेनवॉश केले आणि मला विश्वास दिला की तोच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे. पण तसं नव्हतं. चार महिन्यांचं लग्न एक अंधुक स्वप्न आहे.’ Saif Ali Khan : सैफ अली खानवर भाळली होती ब्रुनेईच्या सुलतानाची लेक; ‘ही’ हिरेजडित वस्तू दिली होती भेट तीपुढे म्हणाली की, ‘मी मिथुन चक्रवर्तीकडून घटस्फोट मागितला होता. तो आज स्टार झाला असेल, पण यामुळे माझी योजना बदलणार नाही. तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस झाला तरी मी त्याच्याकडे परत जाणार नाही. मी त्याच्याकडून पोटगीही मागितली नाही. हे माझ्यासाठी एक दुःस्वप्न होते, जे आता संपले आहे. मिथुन ज्या पद्धतीने आपल्या महिलांचा प्रसिद्धीसाठी वापर करतो आणि त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्याचा मला तिरस्कार वाटतो.’ असा धक्कादायक खुलासा तिने केला होता.
पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर मिथुन योगितासोबत स्थिरावला, सर्व काही ठीक चालले होते. पण नंतर विवाहित असूनही मिथुन श्रीदेवीच्या जवळ आला. दोघांची ऑन-स्क्रीन जोडीही हिट ठरली आणि मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर दोघांमध्ये प्रेमही फुलले होते. श्रीदेवी आणि मिथुन यांनी 1985 मध्ये कोर्टात गुपचूप लग्न केल्याचे सांगितले जाते. अखेरीस 1988 मध्ये जेव्हा श्रीदेवीला समजले की मिथुनने योगिताला घटस्फोट दिलेला नाही, तेव्हा तिने आपला गुप्त विवाह मिथुनशी सार्वजनिक करण्याचा आपला निर्णय बदलला आणि मिथुनपासून विभक्त झाली. त्यानंतर मिथुन यांनी योगिताला समजावून परत आयुष्यात आणले. मिथुनपासून घटस्फोट घेतल्यानंतर हेलेना ल्यूकही आयुष्यात पुढे गेली. बॉलीवूडशी संबंध तोडल्यानंतर हेलेना ल्यूक आता कुठे आहे आणि ती काय करत आहे याची माहिती नाही.