जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'वजन वाढल्याने बॉडी शेम केलं गेलं'; मिस युनिव्हर्स Harnaaz Sandhu चा दुःखद खुलासा

'वजन वाढल्याने बॉडी शेम केलं गेलं'; मिस युनिव्हर्स Harnaaz Sandhu चा दुःखद खुलासा

'वजन वाढल्याने बॉडी शेम केलं गेलं'; मिस युनिव्हर्स Harnaaz Sandhu चा दुःखद खुलासा

हरनाज संधू सध्या उपासना सिंग या अभिनेत्रीने केलेल्या आरोपांमुळे बरीच चर्चेत आली आहे. मिस युनिव्हर्स किताब जिंकलेल्या हरनाजने तिच्या वजनाबाबत एक खुलासा केला आहे.

  • -MIN READ Courtalam,Tirunelveli,Tamil Nadu
  • Last Updated :

मुंबई 06 ऑगस्ट: 2021 मध्ये मिस युनिव्हर्स हा ‘किताब मिळवून संपूर्ण देशभरात स्वतःचं स्थान निर्माण करणारी हरनाज कौर संधू सध्या अनेक कारणांनी चर्चेत येत आहे. कपिल शर्मा शो मधील पिंकी बुआ पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री उपासना सिंगने हरनाजवर आरोप केले असून हरनाजवर कायदेशीर कारवाई होऊ शकते अशी शक्यता समोर येत आहे. याच दरम्यान हरनाजबद्दल समोर आलेल्या आणखीन एका माहितीने सध्या खळबळ उडवून दिली आहे. एकेकाळी हरनाजला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. एकदा तिचं वजन वाढल्याने तिला बुली करण्यात आलं हॉट तसंच तिच्याबद्दल बरंच ट्रोलिंगसुद्धा झालं होतं. तिने असं स्पष्ट केलं की मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर तिच्या वजनात वाढ झाली होती कारण तिने एक महिना वर्क आउट मधून ब्रेक घेतला होता. पीपल मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत हरनाज असं सांगते, “शारीरिक रूपाने मी थोडी जाड झाले होते आणि माझं वजन वाढलं होतं. याला घेऊन माझी काही तक्रार नव्हती. पण वजन वाढल्याने मला खूप टीका टिपण्णी सहन करावी लागली. मला बराच त्रास देण्यात आला. मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या काळात माझं लक्ष माझ्या फिटनेस, वजन, आरोग्याकडे होतं. मी पूर्ण वेळ वर्क आउट करत होते. पण स्पर्धा जिंकल्यानंतर माझ्याकडे आराम करायला महिनाभराचा वेळ होता. त्यादरम्यान मी वर्क आउटमधून ब्रेक घेतला आणि मी माझ्या कुटुंबासोबत एन्जॉय करत होते, सगळं जेवण जेवत होते. त्याचा परिणाम माझ्या शरीरावर होईल याचा विचार मी केला नाही. पण वजनावर झालेल्या अनेक कमेंट्स मुळे मी खूप दुखी झाले होते. मी कुठेही गेले तरी हे विचार माझ्या मनात घोळत होते. माझा अनेकदा ताबा सुटून मी रडले सुद्धा आहे.”

जाहिरात

हरनाज आणि उपासना सिंग यांचा वाद हरनाज येत्या काळात पंजाबी सिनेमा ‘बाई जी कुट्टंगे’ मधून सिनेक्षेत्रात पदार्पण करत आहे. पण अभिनेत्री उपासना सिंग हिने हरनाजवर डील व्यवस्थित पूर्ण न केल्याबद्दल आरोप केला असून तिने न्यायालयाचे दरवाजे सुद्धा ठोठावले आहेत. हरनाजने सिनेमासाठी पंचवीस दिवस देणं गरजेचं असताना ती ईमेल आणि मेसेज यांना उत्तरं देत नसल्याने उपासना सिंग आणि कायदेशीर पर्याय निवडला आहे. त्या सध्या कर्जामध्ये बुडल्याचं सुद्धा समोर येत आहे. हा सिनेमा येत्या ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार असून सुद्धा हरनाज सिनेमाला वेळ देत नसल्याचं समोर आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात