• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ना अमिताभ ना शाहरुख; ऐश्वर्या केवळ या एकाच अभिनेत्याला इन्स्टावर करते फॉलो

ना अमिताभ ना शाहरुख; ऐश्वर्या केवळ या एकाच अभिनेत्याला इन्स्टावर करते फॉलो

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेत लाखो जण ज्या अभिनेत्रीला फॉलो करतात ती मात्र केवळ एकाच अभिनेत्याला फॉलो करते.

 • Share this:
  मुंबई 18 जुलै: अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिला बॉलिवूडची स्वप्नसुंदरी असं म्हटलं जातं. गेली तीन दशकं ती देवदास, जोधा अकबर, हम दिल दे चुके समन, जोश यांसारख्या कित्येक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेली ऐश्वर्या गेली तीन दशकं सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (Aishwarya Rai Movie) चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सोशल मीडियावर तिला जगभरातील लाखो नेटकरी फॉलो करतात. (Aishwarya Rai social media post) परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेत लाखो जण ज्या अभिनेत्रीला फॉलो करतात ती मात्र केवळ एकाच अभिनेत्याला फॉलो करते. कोण आहे तो अभिनेता? ऐश्वर्या सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसते. ती केवळ कुटुंबीयांसोबतच कुठल्याही कार्यक्रमाला हजेरी लावते. त्यामुळे जर तुम्ही तिचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहाल तर त्यामध्ये केवळ कुटुंबीयांसोबत काढलेले फोटो आणि व्हिडीओ दिसतील. पती अभिषेक बच्चन, मुलगी आराध्या, सासरे अमिताभ बच्चन यांच्याच पोस्टनं तिचं इन्स्टाग्राम भरलं आहे. परंतु तरी देखील जवळपास एक कोटी नेटकरी तिला इन्स्टावर फॉलो करतात. मात्र ऐश्वर्या केवळ आपला पती अभिषेक बच्चन यालाच फॉलो करते. बापरे! Hair Transplant साठी संजय जाधवनं खर्च केले इतके लाख प्रियांका चोप्रानं 20 वर्षात जमवली इतकी संपत्ती; आकडा बघून तुम्हालाही बसेल शॉक होय, ऐश्वर्या ना अमिताभ बच्चन, जया बच्चन कोणालाही फॉलो करत नाही. एवढेच काय तर तिच्या मुलीला देखील ती सोशल मीडियावर फॉलो करत नाही. ती केवळ अभिनेता अभिषेक बच्चन यालाच फॉलो करते. अर्थात याचं कारणही तिला अनेकदा विचारण्यात आलं. परंतु तिने मात्र कायमच या मागचं उत्तर देण्याचं टाळलं.
  Published by:Mandar Gurav
  First published: