मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Video: मिकाच्या मदतीसाठी धावले 200 लोक; भर पावसात भिजत केली गायकाची मदत

Video: मिकाच्या मदतीसाठी धावले 200 लोक; भर पावसात भिजत केली गायकाची मदत

त्याच्यासोबत अभिनेत्री आकांशा पुरी देखील आहे. (Mika Singh Video Viral) जवळपास 200 लोक पावसात भिजत त्याची मदत करत आहेत.

त्याच्यासोबत अभिनेत्री आकांशा पुरी देखील आहे. (Mika Singh Video Viral) जवळपास 200 लोक पावसात भिजत त्याची मदत करत आहेत.

त्याच्यासोबत अभिनेत्री आकांशा पुरी देखील आहे. (Mika Singh Video Viral) जवळपास 200 लोक पावसात भिजत त्याची मदत करत आहेत.

मुंबई 19 जुलै: मिका सिंग (Mika Singh) हा सध्याचा बॉलिवूडमधील एक आघाडिचा गायक म्हणून ओळखला जातो. विशेषत: तरुणांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ आहे. लग्न, पार्टी, सार्वजनिक कार्यक्रम यामध्ये मिकाचीच गाणी मोठ्या प्रमाणावर वाजवली जातात. (Mika Singh song) दरम्यान त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मिका गाडीत बसलेला असून त्याच्यासोबत अभिनेत्री आकांशा पुरी देखील आहे. (Mika Singh Video Viral) जवळपास 200 लोक पावसात भिजत त्याची मदत करत आहेत.

हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

मिका आणि आकांशा राहुल वैद्यच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये गेले होते. जवळपास रात्री 3 वाजता ते पार्टीमधून घरी परतत होते. त्यावेळी अर्ध्या रस्त्यात त्यांची गाडी बंद पडली. त्यात जोरदार पाऊस आणि रस्त्यावर साचलेलं पाणी त्यामुळे त्याला गाडीबाहेरही पडता येत नव्हतं. अशा वेळी रस्त्यावरील सर्व लोक त्याच्या मदतीला धावून आले. त्यांनी जोरदार पावसात भिजून त्यांची मदत केली. त्यांनी गाडीला धक्का दिला. आणि गाडी सुरु झाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. मदत करणाऱ्या या सर्व चाहत्यांचे मिका सिंगने मनापासून आभार मानले आहेत.

डिलिव्हरी होताना हरभजन काय करत होता? गीतानं सांगितला एक अजब किस्सा

तारक मेहतामध्ये All Is Not Well? अंजली भाभी ऑफस्क्रीन कोणाशी बोलत नाही

मिका यापूर्वी केआरकेसोबत घेतलेल्या पंग्यामुळे चर्चेत होता. केआरके चित्रपटाचं समिक्षण करताना अनेकदा कलाकारांच्या खासगी आयुष्याची खिल्ली उडवतो. यामुळं सलमान खाननं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच्या या तक्रारीला मिका सिंगनं देखील पाठिंबा दिला होता. मात्र त्याची ही कृती केआरकेला आवडली नाही. त्यानं सलमान खानचा पाळीव कुत्रा अशा शब्दात त्याची खिल्ली उडवली. या प्रकरामुळं मिका आणखी संतापला अन् त्यानं केआरके कुत्ता या गाण्याची निर्मिती केली. सध्या हे गाणं सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत 25 हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First published:

Tags: Entertainment, Singer mika singh, Video viral