मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Delivery होताना Harbhajan काय करत होता? गीतानं सांगितला एक अजब किस्सा

Delivery होताना Harbhajan काय करत होता? गीतानं सांगितला एक अजब किस्सा

अद्याप दुसऱ्या मुलाचं नाव निश्चित केलेलं नाही. परंतु हरभजनबाबत मात्र एक चकित करणारी माहिती गीतानं दिली.

अद्याप दुसऱ्या मुलाचं नाव निश्चित केलेलं नाही. परंतु हरभजनबाबत मात्र एक चकित करणारी माहिती गीतानं दिली.

अद्याप दुसऱ्या मुलाचं नाव निश्चित केलेलं नाही. परंतु हरभजनबाबत मात्र एक चकित करणारी माहिती गीतानं दिली.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 19 जुलै: अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra) आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांच्या आयुष्यात दुसऱ्या बाळाचं आगमन झालं आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच गीतानं दुसऱ्या बाळाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी हरभजनने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना दिली. कुटुंबीयांनी अद्याप दुसऱ्या मुलाचं नाव निश्चित केलेलं नाही. परंतु हरभजनबाबत मात्र एक चकित करणारी माहिती गीतानं दिली. (experience about Birth of a Second Child) बाळाचा जन्म होत असताना हरभजन डिलिव्हरी रूममध्ये चक्क फोटो काढत होता.

तारक मेहतामध्ये All Is Not Well? अंजली भाभी ऑफस्क्रीन कोणाशी बोलत नाही

गीतानं अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत आपल्या दुसऱ्या डिलिव्हरीचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “डिलिव्हरी रूममध्ये हरभजन माझासोबतच होता. परंतु तो माझ्याकडे लक्ष देण्याऐवजी फोटो काढण्यात मग्न होता. जेव्हा मुलाचा जन्म झाला तेव्हा तो आनंदानं नाचू लागला. जोरजोरात गाणी गात होता. जणू त्यानं आपल्या आनंदाची परिसीमाच गाठली होती. त्याला मुलांसोबत खेळायला खूप आवडतं. टीम इंडियामधील जवळपास सर्व मित्रांच्या घरी जाऊन तो आधी त्यांच्या मुलांची भेट घेतो. त्यांच्यासोबत खेळतो. त्यांचे लाड पुरवतो. दुसऱ्या बाळाचा जन्म झाल्यापासून हरभजन अगदी लहानमुलांसारखाच वागू लागला आहे.”

आयरा खानचा मोठा खुलासा; Self careच्या नावाखाली करत होती स्वत:चं नुकसान

गीता बसरा (Geeta Basra) ही कधीकाळी बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. सध्या ती सिनेसृष्टीत सक्रिय नाही मात्र सोशल मीडियाद्वारे ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 1984 साली पोर्टस्माउथ (Portsmouth) येथं तिचा जन्म झाला होता. तिचं संपूर्ण शिक्षण विदेशात झालं असलं तरी तिला भारतीय सिनेसृष्टीबाबत प्रचंड आकर्षण होतं. खरं तर गीताला एक क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट (Criminal Psychologist) व्हायचं होतं. एखादा व्यक्ती गुन्हा करण्याआधी काय विचार करतो? त्याची मानसिकता कशी असते? लोक गुन्हा करण्यासाठी का प्रवृत्त होतात? अशा प्रश्नांची उत्तर तिला शोधायची होती. अन् यासाठी तिनं BLS देखील केलं होतं. पण कॉलेजमध्ये असतानाच तिचा कल अभिनयाच्या दिशेने जाऊ लागला. ती रंगभूमीवरील काही प्रायोगिक नाटकांमध्ये भाग घेऊ लागली. परिणामी पाहाता पाहता अभिनयाच्या दिशेने तिचा प्रवास सुरु झाला. अन् त्याच दरम्यान आदित्य दत्त यानं तिला दिल दिया है या चित्रपटाची ऑफर दिली अन् तिच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली.

First published:

Tags: Bollywood actress, Harbhajan singh