जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / उर्वशीला बॉलिवूड गायकानं घातली होती लग्नाची मागणी; का दिला अभिनेत्रीनं नकार?

उर्वशीला बॉलिवूड गायकानं घातली होती लग्नाची मागणी; का दिला अभिनेत्रीनं नकार?

उर्वशीला बॉलिवूड गायकानं घातली होती लग्नाची मागणी; का दिला अभिनेत्रीनं नकार?

उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या मादक अदांनी घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीवर अनेक नामांकित सेलिब्रिटी देखील फिदा आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 24 फेब्रुवारी : उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या मादक अदांनी घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीवर अनेक नामांकित सेलिब्रिटी देखील फिदा आहेत. उर्वशीनं अभिनयात अद्याप फारशी चमकदार कामगिरी करुन दाखवलेली नाही. मात्र तिचं सौंदर्य पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांकडे खेचले जातात. अशाच लाखो चाहत्यांपैकी एका प्रसिद्ध बॉलिवूड गायकानं तिला लग्नाची मागणी घातली होती. पण उर्वशीनं त्याला थेट नकार दिला. कोण होता तो गायक? उर्वशी त्यावेळी केवळ 17 वर्षांची होती. तिने नुकतीच ‘मिस युनिव्हर्स इंडिया’ ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत विशेष पाहुणे म्हणून गायक मिक्का सिंग (Mika Singh) याला देखील बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी रँपवर उर्वशीचं घायाळ करणारं सौंदर्य पाहून तो अवाक् झाला. या स्पर्धेदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं उर्वशीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र तिनं देखील त्याला थेट नकार दिला. कारण त्यावेळी ती केवळ 17 वर्षांची होती. इतक्या लहान वयात लग्न होण्यास तिच्या पालकांचा देखील नकार होता. अवश्य पाहा -  13 व्या वर्षी श्रीदेवींनी साकारली होती 25 वर्षाच्या रजनिकांतच्या आईची भूमिका त्यावेळी उर्वशी म्हणाली होती, “मी अद्याप 17 वर्षांची आहे. माझं करिअर अत्ताच सुरु झालं आहे. मला इतक्या लवकर कुठल्याही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकायचं नाही. ज्यावेळी माझ्या काकाच्या मुलाचं लग्न होईल त्यानंतर मी लग्न करेन. आणि हो लग्न करण्याची इच्छा होताच सर्वांना याबाबत सांगेन.” उर्वशी आणि मिक्का यांच्यात खुप चांगली मैत्री आहे. मिक्काच्या अनेक म्युझिक अल्बममध्ये ती झळकली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात