जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sridevi Death Anniversary: 13 व्या वर्षी श्रीदेवींनी साकारली होती 25 वर्षाच्या रजनिकांतच्या आईची भूमिका

Sridevi Death Anniversary: 13 व्या वर्षी श्रीदेवींनी साकारली होती 25 वर्षाच्या रजनिकांतच्या आईची भूमिका

Sridevi Death Anniversary: 13 व्या वर्षी श्रीदेवींनी साकारली होती 25 वर्षाच्या रजनिकांतच्या आईची भूमिका

श्रीदेवी (Sridevi) यांनी अगदी लहानपणीच बालकलाकार म्हणून भूमिका साकारण्यास सुरुवात केली होती. वयाच्या तेराव्या वर्षीच श्रीदेवींनी 25 वर्षाच्या रजनिकांत यांच्या आईची भूमिका साकारली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 24 फेब्रुवारी : बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या श्रीदेवी (Sridevi) यांनी आजच्याच दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2018 ला जगाचा निरोप घेतला. मात्र, त्यांच्या आठवणी आजही चाहते आणि बॉलिवूड कलाकारांच्या मनामध्ये ताज्या आहेत. श्रीदेवी यांनी अगदी लहानपणीच बालकलाकार म्हणून भूमिका साकारण्यास सुरुवात केली होती आणि चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. या चित्रपटात साकारली होती रजनिकांतच्या आईची भूमिका - श्रीदेवीनं वयाच्या तेराव्या वर्षीच रजनिकांत यांच्या आईची भूमिका साकारली होती. इतकंच नाही तर यानंतर याच अभिनेत्याची प्रेयसीदेखील त्या बनल्या होत्या. श्रीदेवी यांना जेव्हा तमिळ चित्रपट ‘मूंदरू मुदिचू​(Moondru Mudichu)’ मध्ये रजनिकांत यांच्या आईचा रोल मिळाला तेव्हा त्या अतिशय आनंदात होत्या. कारण, त्यावेळी रजनिकांत यांना सुपरस्टार मानलं जायचं. यावेळी रजनिकांत (Rajinikanth) यांचं वय 25 वर्ष होतं आणि तेरा वर्षांच्या श्रीदेवी त्यांच्या आईच्या भूमिकेत होत्या. या सिनेमात श्रीदेवी आणि रजनिकांत यांच्याशिवाय कमल हसनदेखील झळकले होते. हे आहे श्रीदेवी यांचं खरं नाव - श्रीदेवी यांचं खरं नाव श्री अम्मा यंगर अय्यप्पन (Shree Amma Yanger Ayyapan)  असं होतं. मात्र, नंतर चित्रपटांसाठी त्यांचं नाव बदलून श्रीदेवी असं ठेवण्यात आलं. श्रीदेवी यांनी अनिल कपूरसोबत 13 चित्रपटांमध्ये काम केलं. जितेंद्र यांच्यासोबत त्यांनी 16 चित्रपट केले. अनिल कपूर पुढे श्रीदेवी यांचे दीर झाले. श्रीदेवींनी अनिल कपूर यांचे मोठे भाऊ बोनी कपूर यांच्याशी विवाह केला. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्ल्याळम आणि कन्नड सिनेमांमध्ये काम केलेल्या श्रीदेवींनी चाहत्यांना अनेक खास चित्रपट दिले. श्रीदेवी आणि रजनिकांत यांची मैत्री खूप चांगली होती. दोघांनी जवळपास 20 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. आज पूर्ण झाले तीन वर्ष - 24 फेब्रुवारी 2018 ला श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीनं संपूर्ण देश हादरला. यावेळी श्रीदेवी एका नातेवाईकाच्या लग्नासाठी दुबईला गेल्या होत्या. तिथेच एका हॉटेलमध्ये त्यांचं निधन झालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: sridevi
  • First Published :
जाहिरात
जाहिरात