मुंबई 12 जून: प्रसिद्ध चित्रपट समिक्षक, अभिनेता कमाल आर. खान (Kamaal R. Khan) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतो. तो सतत समिक्षणाच्या निमित्तानं देशातील राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्यानं गायक मिका सिंगशी (Mika Singh) पंगा घेतला आहे. केआरकेच्या रिव्ह्यु देण्याच्या पद्धतीवर मिकानं संताप व्यक्त केला होता. शिवाय त्याची खिल्ली उडवण्यासाठी केआरके कुत्ता (KRK kutta song) असं एक गाणं देखील तयार केलं होतं. अन् हे गाणं आता त्यानं रिलिज केलं आहे. या गाण्याच्या निमित्तानं दोघांमधील वाद आता आणखी पेटला आहे.
अभिनेत्रीची विचित्र फॅशन; पाहा बिग बॉस फेम बिनाफ्शा सुनावालाचे Hot फोटो
प्रकरण काय आहे?
केआरके चित्रपटाचं समिक्षण करताना अनेकदा कलाकारांच्या खासगी आयुष्याची खिल्ली उडवतो. यामुळं सलमान खाननं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच्या या तक्रारीला मिका सिंगनं पाठिंबा दिला. मात्र त्याची ही कृती केआरकेला आवडली नाही. त्यानं सलमान खानचा पाळीव कुत्रा अशा शब्दात त्याची खिल्ली उडवली. या प्रकरामुळं मिका आणखी संतापला अन् त्यानं केआरके कुत्ता या गाण्याची निर्मिती केली.
किमी काटकर ते ममता कुलकर्णी 'या' अभिनेत्री बॉलिवूडमधून अचानक झाल्या गायब; पाहा कोण कोण आहेत
केआरके कुत्ता या गाण्याची घोषणा ऐकून केआरके आणखी संतापला अन् त्यानं गाणं रिलिज करुन दाखवच असा धमकीवजा इशारा दिला. इतकं भुंकतोस कशाला, हिंमत असेल तर गाणं रिलिज करुन दाखव मग तुला बघतो मी अशा आशयाचं ट्विट करुन त्यानं मिकाला आव्हान दिलं होतं. मिकानं देखील हे आव्हान स्विकारलं गाणं युट्यूबवर रिलिज केलं. सध्या हे गाणं सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत 25 हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Singer mika singh, Song