जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मजुरांच्या मदतीसाठी धावलेल्या सोनू सूदने मागितली माफी, वाचा काय आहे कारण

मजुरांच्या मदतीसाठी धावलेल्या सोनू सूदने मागितली माफी, वाचा काय आहे कारण

मजुरांच्या मदतीसाठी धावलेल्या सोनू सूदने मागितली माफी, वाचा काय आहे कारण

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने सध्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने या प्रवासी मजुरांची माफी मागितली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 मे : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सध्या लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या मजुरांची मदत करण्यामध्ये व्यस्त आहे. त्यांना घरी पोहोचवण्यासाठी सोनू प्रयत्न करत आहे. प्रवासी मजुरांसाठी सोनू सूदने नुकताच एक हेल्पलाइन नंबर (Helpline Number) देखील जारी केला होता. ज्या मजुरांना मदतीची आवश्यकता आहे, ते या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करू शकतात, असं आवाहन सोनू आणि त्याच्या टीमकडून करण्यात आले होते. याबाबत त्याने ट्विटरवरून माहिती दिली होती. दरम्यान सोनूने सध्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने या प्रवासी मजुरांची माफी मागितली आहे. तर झालं असं की, सोनूने हेल्पलाइन नंबर जारी केल्यानंतर त्यावर अनेकांनी संपर्क केला. सोनूचे काम पाहून अनेकांना आपापल्या घरी पोहोचण्याची आशा निर्माण झाली. (हे वाचा- वयाच्या 22 व्या वर्षी अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप, कार अपघातात गमावला जीव ) यातील अनेकांना सोनू सूदने मदत जरी केली असली, तरी काही मेसेज किंवा फोनकडे त्याला लक्ष देताआले नाही. अशा मजुरांची आणि प्रवाशांची त्याने ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे. सोनूमे त्याच्या मोबाइलवर येणाऱ्या मेसेजेसचा एक व्हिडीयो शेअर करत असं म्हटले आहे की, ‘तुमचे मेसेज आमच्यापर्यंत वेगाने पोहोचत आहेत. मी आणि माझी टीम पूर्ण प्रयत्न करत आहे की सर्वांपर्यंत मदत पोहोचेल. मात्र या दरम्यान आम्ही कोणते मेसेज वाचू शकलो नाही , तर त्याकरता मला क्षमा करा’.

जाहिरात

ज्या पद्धतीने सोनू महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील मजुरांची मदत करत आहे, त्यावरून त्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. त्याच्या नावाचा हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंड होत होता. दरम्यान सोनूचे कौतुक करणारे मीम्स देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात