ट्रम्प, झुकरबर्ग आणि ट्विटर यांच्यात का रंगलय शाब्दिक युद्ध? वाचा काय आहे वाद

ट्रम्प, झुकरबर्ग आणि ट्विटर यांच्यात का रंगलय शाब्दिक युद्ध? वाचा काय आहे वाद

सध्या ट्विटरवर अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची जोरदार चर्चा आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 28 मे : सध्या ट्विटरवर अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची जोरदार चर्चा आहे. याचं कारण म्हणजे ट्विटरनं केलेलं फॅक्ट चेक (Fact check). ट्विटरच्या वतीनं डोनाल्ट ट्रम्प यांच्या ट्वीटचे फॅक्ट चेक केल्यानंतर हा वाद पेटला. यानंतर ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनं, आम्ही दिशाभूल करणारी माहिती लोकांसमोर आणण्याचं काम करत राहणार असल्याचं सांगितलं. यानंतर फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी ट्रम्प यांची बाजू घेतली. झुकरबर्ग यांनी राष्ट्राध्यक्षांचे केलेले फॅक्ट चेक निंदनीय असल्याचं म्हटलं. व्हाईट हाऊसने बुधवारी सांगितले की, ट्रम्प यांनी वादानंतर सोशल मीडिया कंपन्यांना नियंत्रित करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती.

काय म्हणाला जॅक डोर्सी?

जॅकने एक ट्वीट करत असं म्हटलं की, 'जर या सगळ्या प्रकाराला (ट्रम्प यांच्या ट्विटची फॅक्ट चेक) कोणी जबाबदार असेल तर तो मी आहे. कृपया माझ्या कंपनीतील कर्मचार्‍यांना या वादापासून दूर ठेवा. भविष्यातील निवडणुकांमध्ये जगातही चुकीची, दिशाभूल करणारी आणि विवादित माहिती उघड करण्याचं काम आम्ही करत राहू. या दरम्यान, आमच्याकडून काही चुकले असेल तर आम्ही तेही स्वीकारण्यासही तयार आहोत.

झुकरबर्गलाही सुनावलं

याआधी झुकरबर्गने फॉक्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या खासगी कंपन्यांनी अशा प्रकरणांमध्ये मनमानी करू नये. झुकरबर्गच्या आरोपाला उत्तर देताना जॅकने ट्विट केले की, असे केल्यानं आम्ही सत्याचा निर्णय घेणारे किंवा सर्वज्ञानी होत नाही आमचे उद्दीष्ट कोणत्याही विवादित विधान किंवा माहितीबद्दल योग्य माहिती देणे आहे. ज्याद्वारे लोक स्वत: त्याबद्दल योग्य निर्णय घेऊ शकतात. आम्ही सतत पारदर्शकपणा आणण्याचा प्रयत्न करतो जेणेकरुन युझरना वापरकर्त्यांना हे का होत आहे हे कळेल.

काय म्हणाला होता झुकरबर्ग

यापूर्वी झुकरबर्गने या वादाबद्दल म्हटले होते की, 'आमचे धोरण यावर वेगळे आहे, ट्विटर याबाबत वेगळ्या पद्धतीने काम करते'. झुकरबर्ग पुढे म्हणाला की, माझा विश्वास आहे की लोक ऑनलाईन काय लिहित आहेत या बाबतीत आम्ही प्रत्येक वेळी मध्यस्थीची भूमिका बजावू शकत नाही. अशा परिस्थितीत खासगी कंपन्या, विशेषत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवणाऱ्यांनी अशी भूमिका घेऊ नये.

ट्रम्प यांना पाठवली ट्विटरची पॉलिसी

जॅक डोर्सीनं ट्वीट करत, ट्रम्प यांना ट्विटरची पॉलिसी समजावून सांगितली. यात असे लिहिले होते की, आमच्या सिव्हिक इंटीग्रिटी पॉलिसीनुसार, जे ट्वीट खोटे आहेत त्यांना 'दिशाभूल करणारी माहिती' असे संबोधित केले जाते. यावरून लोकांचा गोंधळ होऊ शकतो की, बॅलेटसाठी नोंदणीही करू नका. आम्ही त्यानुसार ही पॉलिसी अपडेट करत आहोत जेणेकरून या मुद्दा स्पष्ट होईल. ट्विटर धोरणावर जॅकने अपलोड केलेल्या पॉलिसीनुसार ट्विटर सेवेचा उपयोग निवडणूकीत किंवा इतर नागरी प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी किंवा लोकांना फसवण्यासाठी करू शकत नाही.

काय आहे वाद

ट्विटरनं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निवडणुकांबाबत केलेले एक ट्वीट खोटे असल्याचं सांगितलं होतं. यावरून या वादाला सुरुवात झाली. कारण गेली कित्येक वर्ष ट्विटरवर ट्रम्प यांनी केलेल्या ट्वीट पाठिशी घालत असल्याचे आरोप करण्यात आले होते. ट्रम्प यांच्यावर याआधी ट्वीटच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र ट्विटरवरनं त्यांच्यावर कारवाई केली नाही. मात्र अचानक ट्विटरनं केलेल्या फॅक्ट चेकनं ट्रम्पही हादरलं. त्यामुळं त्यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मचे नियम कडक करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले.

First published: May 28, 2020, 3:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading