मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Rajinikanth : मेगास्टार रजनीकांतने अभिनयात येण्याअगोदर केलंय 'हे' काम; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Rajinikanth : मेगास्टार रजनीकांतने अभिनयात येण्याअगोदर केलंय 'हे' काम; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

रजनीकांत

रजनीकांत

दक्षिण फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'थलैवा' या नावाने प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 12 डिसेंबर : दक्षिण फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'थलैवा' या नावाने प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे.  12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरू जन्मलेले रजनीकांत आज त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. रजनीकांत यांनी मनोरंजन क्षेत्रात जवळपास 30 वर्षे पूर्ण केली आहेत आणि यादरम्यान त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

रजनीकांतने दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपला अभिनय आणि स्वॅगची छाप सोडली आहे. मात्र त्यांचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांनी अनेक अडचणींना तोंड देत हा खडतर प्रवास केला आहे. रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरूमध्ये झाला. त्यांच्या आई जिजाबाई त्यांना वयाच्या 5व्या वर्षी सोडून गेल्या. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच जबाबदारीचा भार सहन करावा लागला. सुरुवातीला रजनीकांत यांनी कुली म्हणून काम केलं आणि नंतर त्यांना बस कंडक्टरची नोकरी मिळाली. पण रजनीकांत यांना अभिनेता व्हायचं होतं आणि त्यांचं हे स्वप्न त्यांचा मित्र राज बहादूर यांनी हे स्वप्न जिवंत ठेवले आणि त्यांनीच रजनीकांत यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यास सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Rajinikanth (@rajinikanth)

रजनीकांत यांच्याकडे अभिनयाचे कौशल्य होते आणि त्यांना हिरो बनायचे होते, मग तो दिवसही आला जेव्हा त्यांना त्यांच्या करिअरमधील पहिला चित्रपट मिळाला. रजनीकांत यांना पहिला ब्रेक 1975 मध्ये रिलीज झालेल्या 'अपूर्व रागंगल' या चित्रपटात मिळाला. . या चित्रपटात त्यांच्याशिवाय कमल हासन आणि श्रीविद्या यांसारख्या बड्या स्टार्सनीही काम केले होते. रजनीकांत यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक नाकारात्मक भूमिका केल्या. रजनीकांत यांनी 'भुवन ओरू केल्विकुरी' या चित्रपटात नायकाची भूमिका साकारली होती. त्याचा 'बिल्ला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि त्यामुळे रजनीकांत लोकांच्या नजरेत आले आणि दिवसेंदिवस त्यांची प्रसिद्धी वाढू लागली ती आजतागायत आहे.

दरम्यान, दक्षिणेतील त्यांचे चाहते त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात आणि त्यांना 'थलैवा' म्हणून संबोधतात. चित्रपटांमधील अभूतपूर्व योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले.

First published:

Tags: Birthday, Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Rajnikant, South film, South indian actor, Superstar rajnikant