मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Prarthana Behere: कॅमेरा भिजतोय, टिम पळतेय, पावसात शूटिंग करताना कलाकारांना काय करावं लागतं पाहा

Prarthana Behere: कॅमेरा भिजतोय, टिम पळतेय, पावसात शूटिंग करताना कलाकारांना काय करावं लागतं पाहा

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेची टीम सध्या संततधार पावसात सुद्धा आपलं काम करताना दिसत आहे. पावसाने या मालिकेच्या टीमची बरीच धावपळ होत असल्याचं दिसून येत आहे.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेची टीम सध्या संततधार पावसात सुद्धा आपलं काम करताना दिसत आहे. पावसाने या मालिकेच्या टीमची बरीच धावपळ होत असल्याचं दिसून येत आहे.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेची टीम सध्या संततधार पावसात सुद्धा आपलं काम करताना दिसत आहे. पावसाने या मालिकेच्या टीमची बरीच धावपळ होत असल्याचं दिसून येत आहे.

  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 15 जुलै: पावसाळ्याचे दिवस सुरु असतानासुद्धा मराठी मालिकांमध्ये शूटिंग अविरत चालू आहे. ऊन असो किंवा पाऊस कोणत्याही वातावरणात कलाकार मेहनतीने शूटिंग करताना दिसतात. पण कलाकारांचं शूटिंग व्यवस्थित पार पडण्यासाठी नेमकं पडद्यामागे काय होत असतं हे माहित करून देण्यासाठी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचे काही bts व्हिडिओ सध्या viral होत आहेत.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत येत्या काळात मान्सून (Mazhi Tuzhi Reshimgath monsoon special) स्पेशल ट्रॅक पाहायला मिळणार आहे. यासाठी धुवांधार पावसात कलाकार आणि तंत्रज्ञ सगळे एकत्र येऊन चित्रीकरण करताना दिसत आहेत. प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या अभिनेत्रीने खास व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना शूटिंगच्या काही क्षणांची झलक दाखवली आहे.

या व्हिडिओमध्ये तांत्रिक सामानाची व्यवस्थित काळजी घेऊन, पावसात न भिजू देता मालिकेची टीम कसं चित्रीकरण करते हे दिसून येत आहे. तसंच यश नेहाची सायकलवरून येत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. मालिकेला टीआरपी सुद्धा चांगला असल्याने सध्या बरेच ट्विस्ट सुद्धा दिसून येत आहेत.

हे ही वाचा- Man Udu Udu Zala: 'मन रडू रडू झालं'; मालिका संपताना कलाकारांचा वन लास्ट डान्स झाला VIRAL

प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तपळदेसुद्धा भर पावसात शूटिंग करताना आणि सोबत पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. दोघेही वर्क फ्रंटवर सध्या खूप ऍक्टिव्ह असल्याचं दिसून येत आहे. श्रेयसची कंगना रणौतच्या नव्याकोऱ्या सिनेमात वर्णी लागल्याचं पाहायला मिळत आहे. प्रार्थनाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर सध्या बऱ्याच लाईक्स आणि कमेंट्स येताना दिसत आहेत. चाहत्यांना या निमित्ताने टीमची धावपळ पाहायला मिळाली आहे. प्रेक्षकांना कोणत्याही परिस्थितीत एपिसोड दाखवण्याची जबाबदारी असणाऱ्या टीमचं खूप कौतुक होताना दिसत आहे.

सध्या माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहा ऑफिसचा कार्यभार सांभाळताना दिसत आहे तसंच सिम्मीने रचलेल्या जाळ्यात काहीशी अडकताना सुद्धा दिसत आहे. मालिकेत यश आणि नेहाचं भांडण सुद्धा झालं होतं. मालिकेत नेहा पाय घसरून पडते आणि तिच्या डोक्याला जखम होते आणि त्या निमित्ताने नेहा यशमधलं भांडण सुद्धा संपुष्टात येतं असं आत्तापर्यंत पाहायला मिळालं आहे.

First published:

Tags: Prarthana Behere, Zee marathi serial