मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Man Udu Udu Zala: 'मन रडू रडू झालं'; मालिका संपताना कलाकारांचा वन लास्ट डान्स झाला VIRAL

Man Udu Udu Zala: 'मन रडू रडू झालं'; मालिका संपताना कलाकारांचा वन लास्ट डान्स झाला VIRAL

मन उडू उडू झालं मालिकेच्या शेवटच्या दिवशी शूटिंग नंतर टीमने बरीच धमाल केल्याचं दिसून आलं आहे. हृता दुर्गुळे, अजिंक्य राऊत सह सर्व टीमचे सदस्य एकमेकांसोबत शेवटचा दिवस एन्जॉय करताना दिसले.

मन उडू उडू झालं मालिकेच्या शेवटच्या दिवशी शूटिंग नंतर टीमने बरीच धमाल केल्याचं दिसून आलं आहे. हृता दुर्गुळे, अजिंक्य राऊत सह सर्व टीमचे सदस्य एकमेकांसोबत शेवटचा दिवस एन्जॉय करताना दिसले.

मन उडू उडू झालं मालिकेच्या शेवटच्या दिवशी शूटिंग नंतर टीमने बरीच धमाल केल्याचं दिसून आलं आहे. हृता दुर्गुळे, अजिंक्य राऊत सह सर्व टीमचे सदस्य एकमेकांसोबत शेवटचा दिवस एन्जॉय करताना दिसले.

मुंबई 15 जुलै: मन उडू उडू झालं (man udu udu zhala off air) मालिकेचा शेवटचा भाग नुकताच चित्रित करण्यात आला. मालिकेचा टीआरपी आणि फॅन फॉलोईंग दोन्ही जास्त असतानाही मालिकेतील कलाकारांच्या काही प्रोफेशनल कारणांनी ही मालिका आता चाहत्यांचा निरोप घेणार आहे. नुकतेच या मालिकेतील कलाकारांनी खास फोटो शेअर करून एकमेकांसोबत घालवलेल्या शेवटच्या दिवसाचे काही क्षण शेअर केले. आता या टीमने मालिकेच्या टायटल सॉंगवर केलेला डान्स viral होताना दिसत आहे.

मालिकेच्या शेवटच्या दिवशी मन उडू उडू झालं च्या टीमने (man udu udu zala team dance) धमाकेदार टायटल ट्रॅकवर डान्स केल्याचं पाहायला मिळालं आहे. हृता दुर्गुळे सह अजिंक्य राऊत आणि इतर कलाकार सुद्धा वन लास्ट टाईम असं म्हणत एकदा शेवटचं मालिकेच्या शीर्षकगीतावर थिरकताना दिसले आहेत. मालिकेच्या यशाचं सेलिब्रेशन करत टीमने केक कापून एकमेकांचं अभिनंदन केल्याचं सुद्धा viral होणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. या मालिकेने चाहत्यांना बरंच खिळवून ठेवलं होतं तसंच इंद्रा आणि दिपूचा फॅनबेस सुद्धा बराच मोठा होता. मालिकेच्या अशा बंद होण्याच्या बातमीनंतर चाहत्यांमध्ये बरीच निराशा पसरली होती.

मन उडू उडू झालं मालिका निरोप घेणार ही माहिती समोर आल्यावर चाहत्यांचं मात्र मन रडू रडू झालं अशी अवस्था झाली होती. अनेकांनी मालिकेला ऑफ एअर करू नका अशी सुद्धा मागणी केली. पण मालिकेतील कलाकारांच्या प्रोफेशनल कमिटमेंटमुळे मालिकेने थांबण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा-  Man Udu Udu Jhala:शेवटच्या दिवशी कलाकार झाले इमोशनल; एकत्र येत क्लिक केले झक्कास फोटो

सध्या तरी मन उडू उडू झालं मालिकेची स्टारकास्ट या व्हिडिओमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. ही टीम बरीच धमाल एकत्र करताना दिसत असायची. या मालिकेत आता इंद्रा आणि दिपूचं लग्न पाहायला मिळणार आहे. देशपांडे सरांनी अखेरीस इंद्राला स्वीकारलं असून मालिकेत आता आनंदाचे क्षण दिसून येणार आहेत. या मालिकेमुळे हृता दुर्गुळेला दिपू या पात्राने बरीच ओळख दिली. तसंच अजिंक्य आणि हृताचा मोठा चाहतावर्ग सुद्धा तयार झाला.

वर्क फ्रंटवर हृता सध्या बरीच व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. हृता येत्या काळात अनन्या आणि टाईमपास 3 अशा सिनेमात दिसून येणार आहे तर अजिंक्य सुद्धा लवकरच नव्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळेल असं सांगितलं जात आहे. हृताने दादा एक गुड न्यूज आहे मालिकेतून सुद्धा एक्झिट घेतली आहे. तसंच मन उडू उडू झालं मालिकेची जागा आता ‘तू चाल पुढं’ ही मालिका घेणार आहे.

First published:

Tags: Zee Marathi, Zee marathi serial