मुंबई, 1 नोव्हेंबर :नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा पार पडला. त्यात अनेक कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात माझी तुझी रेशीमगाठ( Mazi Tuzi Reshimgath)या मालिकेला जास्त पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट आई, बालकलाकार, मित्र, सहकलाकार .. असे बरेचसे पुरस्कार या मालिकेला देण्यात आले. मालिकेतील शेफालीचे (shefali )पात्र साकारणारी अभिनेत्री काजल काटे हिने पुरस्कार मिळाल्याबद्दल एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. कोरोनात अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक कमावले. काजलने (kajal kate) देखील तिच्या आई वडिलांना कोरोनात गमावले आहे. याबद्दलत तिने पुरस्कार मिळताच भावनिक पोस्ट करतं मनमोकळं केलं आहे.
पुरस्कार स्वीकारताना काजल भावुक झालेली पहायला मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच काजलच्या आई आणि वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे काजल अधिकच भावनिक झालेली दिसली. या यशाचे श्रेय सांगताना ती म्हणते की,…आई बाबा 2021 एप्रील महिन्यात कोरोनाच्या भयंकर लाटेत मला व माझ्या बहीणीला एका क्षणात सोडून गेले, आणि आमच्या आयुष्यात कायमची शांतता पसरली. मग झी मराठीचे हे प्रोजेक्ट मला मिळालं …हे मिळवणं इतकं सोप्पं नव्हतं.
वाचा. Bigg Boss Marathi : एक आत एक बाहेर; बिग बॉसच्या घरातून आविष्कार दारव्हेकर बाहेर!
ऑडिशन दिली, परत परत ऑडिशन देऊन इतक्या सगळ्या दिगज्जांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. हे सगळं घडलं आई बाबांच्या आशिर्वादामुळे. sunil vasant bhosale सरांनी माझे नाव सुचवले आणि मला पूजा कुलकर्णीचा फोन आला. त्यावेळी मला काहीच कल्पना नव्हती, की मी कणाबरोबर काम करणार आहे. पण सेटवर पहिलाच दिवस आणि समोर श्रेयश सर, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी सर. बरं मग कळलं की, आता आपली खरी परीक्षा सुरू झालीये. पण ह्या सगळ्यांनी मला कधीच जाणवू दिले नाही की मी त्यांच्या समोर नवीन आहे किंवा लहान आहे . खुप सांभाळून घेतलं मला. या पुरस्काराचं श्रेय जेवढं माझ्या आई बाबांना जातं तेवढंच माझ्या सगळ्या सहकलाकारांना देखील जातं.
View this post on Instagram
एक व्यक्ती ज्यांच्या मुळे शैफालीला तुम्ही सगळे इतकं प्रेम देताय ती व्यक्ती म्हणजे अजय मयेकर, This man has made me from nothing to everything by teaching me small small things ,this was possible just becoz of our director/producer Ajay Mayekar sir , and the most important part of my journey my family my husband my mother-in-law my sister my brother-in-law who always had trust on me that one day I will definitely achieve my dreams स्नेहा अशोक मंगल, प्रतीक कदम, ऋषिकेश शेलार, करून कदम and my sister-in-law of course who always encourages me वैष्णवी बोरकर Thank you my audience my insta family for loving me unconditionally .I promise I will work hard and will entertain you by playing different shades on television. I love you पूजा कुलकर्णी for always being der by my side my onset bestie. Mumma pappa I hope you both are feeling proud as I have started my journey to achieve our dreams those dreams which we’ve seen together . And last but but not the least my lil munchkin मायरा वायकुळ love you pillu thank you khup bolle Thank you so much Nilesh Mayekar sir ,Padma mam and झी मराठी for accepting me as a new member of this zee family. आणि माझे चाहते यांचे खूप खूप आभार.. अशी काहीशी भावनिक पोस्ट तिनं लिहिली आहे.
वाचा : Aishwarya Rai ची एकूण संपत्ती ऐकून थक्क व्हाल; तिचे महिन्याचे उत्पन्न किती?
काजलने तिचे सासू सासरे व सहकलाकर तसेच मालिकेचे निर्माते व तिचा नवरा, घरच्या सर्व मंडळीचे व चाहते , प्रेक्षका या सर्वांचे आभार मानले आहेत. पुरस्कार स्वीकारताना देखील काहीशी भावूक झाली होती. शेफालीचे पात्र कमी काळात लोकांना आवडू लागले आहे. शेफालीचा सोशल मीडियावर चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर विविध फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials, Zee Marathi, Zee marathi serial