मुंबई, 02 जून: स्टार प्रवाहवरील (Star Pravah) सर्वांची लाडकी मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील अरुंधती (Arundhati) सर्वांची लाडकी आई आहे. अरुंधती आतापर्यंत चांगली आई होती, सून, बायको, सासू, मैत्रिण होती. या सगळ्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या संभाळल्यानंतर अरुंधतीच्या आयुष्यात आजी होण्याचं सुख येणार आहे. अरुंधतीची सुन अनघाला (Angha Pregnant) दिवस गेले असून अनघा आणि अभी लवकरच आई बाबा होणार आहेत. अनघाने दिलेल्या गोड बातमीने देशमुख कुटुंबीय आनंदी झाले आहे. पण अभीच्या ‘त्या’ निर्णयामुळं कहाणीत नवा ट्विस्ट येणार आहे. काय घडणार येत्या भागात जाणून घ्या. आई कुठे काय करते? मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. आजी होण्याच्या बातमीने अरुंधती जरी सुखावली असली तरी अभिला मात्र बाबा नकोय. अभीच्या या निर्णयाने सर्वांनाच चांगलाच धक्का बसलाय. पण अभिचं ऐकून घेईल ती अरुंधती कसली. अभिच्या निर्णयावरुन अरुंधती त्याला चांगलेच खडे बोल सुनावणार आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, अरुंधीत देशमुखांच्या घरी येते. तेव्हा अनिरुंध ‘अरुंधती तू आजी होणार आहेस’, असं म्हणतं तिचं अभिनंदन करते. आजी होणार या आनंदाने अरुंधती पेढ्यांचा बॉक्स घेऊन अनघाकडे जात असतानाच अभि तिला ‘आम्हाला हे मुल नकोय’, असं सांगतो. अभिच्या वक्तव्याने सगळ्यांनाच धक्का बसतो. अभि म्हणतो, ‘आम्हाला हे मुल नकोय, तु हाऊस वाइफ होतीस आमचं करिअर बाकी आहे अजून’. तितक्यात संजना ‘अभीचं बरोबर आहे’, असं म्हणते. त्यावर अरुंधतीचा पारा चढतो ती संजनावर ‘तु तुझं थोबाड बंद करट, म्हणत दुसरीकडे अभिला चांगलंच खडसावते. अरुंधती अभिला उत्तर देत म्हणते, ‘मी जर माझ्या करिअरचा विचार केला असता तर तु आज या जगात नसतास’. मालिकेचा हा प्रोमो पाहून येत्या भागात नवीन गोष्ट पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मालिकेत आलेला नवा ट्विस्ट काय रंगत आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एकीकडे अरुंधती आणि आशुतोषची मैत्री होत असताना दुसरीकडे अरुंधती आजी होणार आहे. मालिकेत आलेलं हे वळण पुढे काय मज्जा आणणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्साही आहेत. तसेच अरुंधतीच्या बोलण्यानंतर अभि त्याचा निर्णय बदलणार का? हे पाहणं ही महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.