मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'तिमिरातील तिरीपेचा शोध मी घेईन...' प्राजक्ता माळीची गूढ वाढवणारी 'ती' पोस्ट नेमकी कशाबद्दल?

'तिमिरातील तिरीपेचा शोध मी घेईन...' प्राजक्ता माळीची गूढ वाढवणारी 'ती' पोस्ट नेमकी कशाबद्दल?

आता प्राजक्ता माळी पुन्हा एक नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सध्या तिनं याबद्दल एक पोस्ट केली आहे.

आता प्राजक्ता माळी पुन्हा एक नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सध्या तिनं याबद्दल एक पोस्ट केली आहे.

आता प्राजक्ता माळी पुन्हा एक नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सध्या तिनं याबद्दल एक पोस्ट केली आहे.

  मुंबई, 2 जून- अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajaktta Mali )  मागच्या काही दिवसांपासून तिच्या रानाबाजार या वेबसिरीजमुळे चांगलीच चर्चेत आहे. रानबाजारमधील तिच्या भूमिकेचे समीक्षकांकडून कौतुक झालं. पण नेटकऱ्यांना तिचा बोल्ड अंदाज रूचला नाही. यामुळं तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता प्राजक्ता माळी पुन्हा एक नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सध्या तिनं याबद्दल एक पोस्ट केली आहे. प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. मुक्ता ब्रर्वेची मुख्य भूमिका असलेला सत्य घटनेवर आधारित वाय हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय आहे यावरून अद्याप पडदा उठलेला नाही. मात्र या सिनेमाचं मागच्या काही दिवसांपासून जोरदार प्रमोशन सुरू आहे. राजकीय मंडळी ते अनेक सेलेब्यनी देखील वाय सिनेमाची पाठी हातात घेऊन या सिनेमाचं प्रमोशन केलं आहे. प्राजक्ता माळी देखील याचं प्रमोशन करताना दिसली होती. आता प्राजक्ता माळीनं या सिनेमाबद्दल एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे या सिनेमात तिची नेमकी भूमिका काय आहे याबद्दल उत्सुकता वाढवत आहे. वाचा-'लगान' ते 'गंगूबाई'... राणी मुखर्जीने नाकारले होते हे सर्वोत्कृष्ट चित्रपट प्राजक्ता या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तिमिरातील तिरीपेचा शोध मी घेईन...मशाल चेतावण्या 'ती'ची ज्योत मी होईन...' वाय ' 24 जूनपासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात. तिनं शेअर केलेल्या व्हिडिओतून तिचा या सिनेमातील लुक तर समोर आलाच आहे शिवाय तिनं दिलेल्या कॅप्शनमध्ये ती कशाच्या तरी शोधात असल्याचे नक्की झालं आहे. त्यामुळं या सिनेमात प्राजक्ता नक्कीच चालेजिंग भूमिकेत दिसणार हे पक्क आहे. चाहते देखील तिला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत आणि तिला यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Y The Film (@ythefilm)

  अजित सूर्यकांत वाडीकर (Ajit Wadikar ) दिग्दर्शित आणि अभिनेत्री 'मुक्ता बर्वे' (Mukta Barve) मुख्य भूमिकेत असलेला 'वाय' (Y the Film) हा सिनेमा येत्या 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'वाय'चा पहिला लुक समोर आल्यापासूनच सिनेमाप्रती अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. सिनेमाच्या नावावरुन देखील अनेकांनी प्रश्न विचारले आहेत. सिनेमाच्या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वेने हातात मशाल धरली होती. सिनेमाचं हे आगळंवेगळं पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलंं. पोस्टरमध्ये मशाल घेऊन नक्की मुक्ता बर्वे कोणासोबत लढत आहे याचे विविध अंदाज अजूनही लावले जात आहेत. सिनेमाविषयी अनेक प्रश्न पडलेले असताना सिनेमाचा टीझर देखील काही दिवसापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. परंतू सिनेमातील गुढ अद्याप कायम आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या