Home /News /entertainment /

यशसोबत रेशीमगाठ बांधताना रक्ताचं नातं नेहा लपवणार का? लग्नानंतर परीचं काय होणार...

यशसोबत रेशीमगाठ बांधताना रक्ताचं नातं नेहा लपवणार का? लग्नानंतर परीचं काय होणार...

माझी तुझी रेशीमगाठ मालिका (Mazi tuzi reshimgath latest episode) सध्या वेगळ्या वळणावर आहे. यशसोबत लग्न करण्यासाठी नेहा अजोबांसमोर परीचं सत्या लपवणार का, सत्य सांगणार.

  मुंबई, 21 मार्च- माझी तुझी रेशीमगाठ मालिका (Mazi tuzi reshimgath latest episode)  सध्या वेगळ्या वळणावर आहे. यश आणि नेहाच्या प्रेमाची गाडी रूळावर आली आहे. आता दोघे लग्न करणार आहेत. असं जरी असलं तरी नेहा यशच्या आजोबांना अद्याप भेटलेली नाही. त्यामुळे आजोबांना भेटण्यासाठी नेहा परीचं सत्य लपवणार का असा प्रश्न पडला आहे. झी मराठीनं नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये यश नेहाला आजोबांना भेटण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो की, आजोबांसमोर परीचा विषय काढू नको. आजोबांना भेटल्यानंतर नेहाला ते नेहाला एक सोन्याचा हार देतात. म्हणतात की, यशच्या आजीने हा हार नाथ सूनबाईसाठी ठेवाला होता आणि हा आता तुझा आहे. आता तू या घरात लग्न करून यायचं. यानंतर नेहा देखील काहीशी भावुक होते. वाचा-'रंग माझा वेगळा' फेम दीपिका आहे स्टार किड्स, या अभिनेत्रीची आहे मुलगी मात्र यशसोबत लग्नगाठ बांधण्यासाठी नेहाला तिचं रक्ताच नातं लपवावं लागणार का...असा देखील प्रश्न आहे. परीसाठी नेहा कोणता निर्णय घेणार असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या गोष्टींचा उलगडा हा येणाऱ्या भागातच होणार आहे.
  नुकतीच परीनं यशची मुलाखत घेतली. मुलाखत म्हणण्यापेक्षा एक मुलाखतच घेतली. बाबा म्हणून परीनं यशला मान्य केलं नव्हतं. आता मात्र यशने ही परीक्षा पास केली आहे. शिवाय नेहा आणि यशच्या लग्नाला परवानगी देखील दिली आहे. असं जरी असलं तरी परीचं सत्य जेव्हा यशच्या आजोबांना समजेल तेव्हा ते नेहाच्या आणि यशच्या लग्नाला परवानगी देतील का हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial, Zee marathi serial

  पुढील बातम्या