Home /News /entertainment /

'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपिका आहे स्टार किड्स, या टीव्ही अभिनेत्रीची आहे मुलगी

'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपिका आहे स्टार किड्स, या टीव्ही अभिनेत्रीची आहे मुलगी

​स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा ही मालिका लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील दीपिका तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकत असते. पण तुम्हाला माहिती आहे दीपिका ही एका मराठी अभिनेत्रीची मुलगी आहे.

  मुंबई, 20 मार्च- ​स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा ही मालिका लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील  दीपिका तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकत असते. पण तुम्हाला माहिती आहे दीपिका ही एका मराठी अभिनेत्रीची मुलगी आहे. होय दीपिका स्टार किड्स आहे. दीपिकाची भूमिका बालकलाकार स्पृहा दळी हिने साकारली आहे. आज आपण स्पृहा बद्दल जाणून घेणार आहे. स्पृहा दळे सध्या पहिल्या इयत्तेचे धडे गिरवत आहे. शाळा ऑनलाईन असल्याने तिला मालिकेत देखील काम करण्याची संधी मिळाली आहे. रंग माझा वेगळा या मालिकेसाठी स्पृहाने ऑडिशन दिली होती, त्यात तिचे सिलेक्शन झाले होते.रंग माझा वेगळा ही स्पृहाची पहिलीच मालिका आहे. दीपिकाच्या भूमिकेमुळे स्पृहाला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. स्पृहा दळी  ( spruha dali ) ही स्टार किड्स म्हणून ओळखली जाते. मराठी मालिका अभिनेत्री वेदश्री दळी (vedaashri dali )  हिची ती मुलगी आहे. वाचा-'तू तेव्हा तशी' मध्ये अभिज्ञाचा असणार असा लुक, समोर आला सेटवरील Video वेदश्री विनय दळी यांनी मराठी मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. कलर्स मराठीवरील श्री स्वामी समर्थ या मालिकेत मालोजीराजेंच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय झी मराठीवर गाजलेली मालिका स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवार बाईंची भूमिका साकारली होती. सोनी मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या सुंदर आमचे घर या मालिकेत वेदश्री दळी प्रणालीची भूमिका साकारताना दिसत आहे.
  श्वेता फोनवर बोलत असताना जवळच दीपिका असल्याचे तिला समजते ते पाहून ती अनाथ मुलगी आहे हे मुद्दामहून बोलते. श्वेताचे हे बोलणे ऐकून दीपिका मात्र अस्वस्थ होते आणि रडू लागते. तर दुसरीकडे दीपा आणि कार्तिक यांच्यात गैरसमज झालेले असतात. हे वाद मिटवण्यासाठी ती कार्तिककडे माफी मागायला जाते.मात्र यात तिला कार्तिकचेच बोलणे ऐकून घ्यावे लागते. मला फक्त गैरसमज दूर करायचे होते म्हणून मी इथे आले होते, हे दीपा कार्तिकला स्पष्ट सांगते व  ती कार्तिकीला घेऊन तिथून निघून जाते.
  त्यांच्या पाठोपाठ दुखावलेली दीपिका देखील घर सोडून कार्तिकीच्या घरी जाते. मालिकेत दीपिका अनाथ नसून ती दीपा आणि कार्तिकचीच मुलगी आहे, हे तिला कधी समजणार याची प्रेक्षक आता वाट पाहत आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या