जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / माझी तुझी रेशीमगाठमधून प्रसिद्ध कलाकाराची एक्झिट, कोण साकारणार ही भूमिका? पाहा VIDEO

माझी तुझी रेशीमगाठमधून प्रसिद्ध कलाकाराची एक्झिट, कोण साकारणार ही भूमिका? पाहा VIDEO

माझी तुझी रेशीमगाठमधून प्रसिद्ध कलाकाराची एक्झिट, कोण साकारणार ही भूमिका? पाहा VIDEO

Majhi Tuzhi Reshimgath: माझी तुझी रेशीमगाठ मालिकेमध्ये यशवर्धन चौधरीचे आजोबा अर्थात जगन्नाथ चौधरी ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारत होते. मात्र बऱ्याच एपिसोड्सपासून ते या मालिकेमध्ये दिसले नाही आहेत. या संदर्भात आता नवीन अपडेट समोर आले आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 मार्च: माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgath) ही मालिका आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. यश आणि नेहा (Yash and Neha Love Story in Mazhi Tuzhi Reshimgath) यांचे लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या मालिकेच्या एका पात्रामध्ये महत्त्वाचा बदल पाहायला मिळतो आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेमध्ये यशवर्धन चौधरीचे आजोबा अर्थात जगन्नाथ चौधरी ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारत होते. मात्र बऱ्याच एपिसोड्सपासून ते या मालिकेमध्ये दिसले नाही आहेत. मात्र अलीकडेच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये जगन्नाथ चौधरी यांच्या भूमिकेत मोहन जोशींच्या जागी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर (Mohan Joshi replaced by Pradeep Velankar) दिसून आले आहेत. त्यामुले आधीचे जगन्नाथ चौधरी अर्थात मोहन जोशी यांनी मालिकेतून एक्झिट घेतल्याचे समजते आहे. मायरा वायकुळ (Pari Myra Vaikul) आणि झी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर या मालिकेच्या नवा एपिसोड्सचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. टीव्हीवर देखील हा प्रोमो (Mazhi Tuzhi Reshimgath new promo) दाखवण्यात येत आहे. ज्यामध्ये परी यशची मुलाखत घेताना दिसत आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की आजोबांची भूमिका साकारणाऱ्या मोहन जोशींऐवजी त्याठिकाणी प्रदीप वेलणकर दिसून येत आहेत. हे वाचा- यशचा बाबा म्हणून परी स्वीकार करणार पण त्यातही आहे मोठा ट्विस्ट, काय आहे तिची अट; अचानक झालेल्या या बदलामुळे चाहत्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. मायराच्या या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोवर चाहत्यांनी नाराजीच्या स्वरात काही कमेंट्स केल्या आहेत. ‘आजोबा का बदलले’ असा सवाल त्यांनी केला आहे. एका युजरने असं म्हटलं आहे की, ‘परी आणि आधीच्या आजोबांची बाँडिंग बघायची होती.’ झी मराठीच्या पेजवर शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोवर कमेंट करताना एका युजरने म्हटलं आहे की, ‘प्लीज मोहन जोशींना परत आणा, तो रोल त्यांनाच शोभतो.’ या बदलाबाबत जरी चाहते काहीसे नाराज असले तरी परीचं कौतुक मात्र सुरुच आहे. या प्रोमोमधूनच तिचा स्वॅग पाहायला मिळतो आहे. हे वाचा- ‘‘मला कधीच चित्रं काढता आली नाहीत.. पण’’; कुशल बद्रिकेची मार्मिक पोस्ट चर्चेत ‘परी नाम सून के बच्ची समझे क्या…’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मालिका लाँच होण्यापूर्वीच्या प्रोमोमध्ये जशी परी पिंक ड्रेसमध्ये दिसली होती, तशाच अंदाजात परी यामध्ये दिसत आहे.

जाहिरात

सध्या नेहा आणि यश यांची लव्ह स्टोरी (Neha Kamat and Yash Chaudhary) असा ट्रॅक जरी मालिकेमध्ये सुरू आहे. मात्र या दोघांचं नातं पुढे जाण्यासाठी एक अडचण आहे, ती म्हणजे परीने यशचा बाबा म्हणून स्वीकार करण्याची. आधीच्या काही एपिसोड्सध्ये परी या पात्राने यशचा बाबा म्हणून स्वीकार करण्यास नकार दिला होता. मात्र आता परी यशचा बाबा म्हणून स्वीकार करण्याआधी त्याची मुलाखत घेणार आहे. त्यानिमित्तच एका तासाच्या विशेष भागाचा हा प्रोमो शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये आजोबांची भूमिका करणारे कलाकार बदलल्याचे समजले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात