मुंबई, 18 मार्च- 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला हसवून-हसवून लोटपोट केलं आहे. या कार्यक्रमातील कलाकारसुद्धा घराघरात पोहोचले आहेत. भाऊ कदम (Bhau Kadam) पासून कुशल बद्रिकेपर्यंत (Kushal Badrike) सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरले आहेत. या कलाकारांचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांना या कलाकरांबद्दल जाणून घ्यायला प्रचंड आवडतं. म्हणूनच आज आपण कुशल बद्रिकेने शेअर केलेली खास पोस्ट पाहणार आहोत.
आज देशभरात होळी आणि रंगपंचमीची धूम सुरु आहे. सर्वसामान्य लोकांपासून कलाकरांपर्यंत सर्वचजण रंगांमध्ये न्हाऊन निघत आहेत. आज सर्वत्र प्रेमाचे, उत्साहाचे, आनंदाचे आणि आठवणींचे रंग उधळले जात आहेत. अनेक कलाकार सोशल मीडियावर आपले फोटो व्हिडीओ हेअर करून आपल्या होळी सेलिब्रेशनची झलक चाहत्यांना दाखवत आहेत. कुशल बद्रिकेनेसुद्धा असंच काहीसं केलं आहे.
View this post on Instagram
अभिनेता कुशल बद्रिकेने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो आपल्या कुटुंबासोबत रंगपंचमीची धम्माल करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सर्वजण आनंदाने रंगाची उधळण करताना दिसून येत आहेत. शिवाय व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये आलिया भट्टच्या 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटातील 'ढोलिडा' हे गाणं वाजत आहे.
(हे वाचा:PHOTOS:भाऊ कदम ते हृता दुर्गुळे मराठी कलाकारांनी धुमधडाक्यात साजरी केली होळी)
व्हिडीओ शेअर करत कुशल बद्रिकेने एक छोटीशी मार्मिक पोस्टसुद्धा लिहिली आहे. अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, 'मला चित्र काढायला कधीच आली नाहीत, पण नात्यांमध्ये रंग भरता आली, त्यामुळे आयुष्याचं चित्र मात्र छान जमलं.“आयुष्य सुंदर आहे, ते ह्याच रंगांमुळे.”रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा'. असं म्हणत अभिनेत्याने सर्वांनाच नात्यांमध्ये रंग भरण्याची कला समजावली आहे. कुशल बद्रिकेची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांना फारच पसंत पडली आहे. चाहते या व्हिडीओवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chala hawa yeu dya, Entertainment, Holi 2021, Marathi entertainment