**मुंबई, 14 ऑक्टोबर :**स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेत सध्या सगळं वातावरण चांगलं आहे. गौरी आणि जयदीप यांचा सुखाचा संसार चालू आहेच त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. गौरीने नुकतंच एका मुलीला जन्म दिला आहे. मात्र तरीही गौरी आणि जयदीपच्या आयुष्यातील संकटांची मालिका काही संपलेली नाही. शालिनी नेहमीच त्यांच्यात गैरसमज निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करते. गौरी आणि जयदीप यांच्यात दुरावा निर्माण करण्यासाठी ती सतत काही ना गोष्टी धडवून आणत असते. आताही तिने पसरवलेल्या जाळात जयदीप फसणार आहे. मालिकेत एक मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शालिनी नेहमीच गौरी आणि जयदीप यांच्यात दुरावा निर्माण करण्यासाठी ती सतत काही ना गोष्टी धडवून आणत असते. पण ही दोघे सगळ्या संकटांचा सामना करतात. पण आता दोघांमध्ये तिसरा पाहुणा आला आहे. त्यामुळॆ घरात आनंदाचं वातावरण आहे. पण याचवेळी जयदीपला मात्र वेड लागायची पाळी आली आहे. याचं कारण म्हणजे त्याला बाळाविषयी वाटणारी काळजी. गौरी हॉस्पिटलमध्ये असताना शालिनीने त्यांचं बाळ गायब केलं होतं. तेव्हापासून जयदीपला त्यांचं बाळ कुणीतरी घेऊन जाईल अशी भीती सतावते. त्याच्या याच भीतीचा फायदा सध्या शालिनी घेत आहे. हेही वाचा - Bigg boss marathi 4: ‘मी कट्टर आहे’; पुन्हा कशावरुन पेटली अपूर्वा? शालिनी जयदीपला भेडवण्याचा सतत प्रयत्न करतेय. मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. टीआरपी मराठीने टाकलेल्या प्रोमोनुसार मालिकेच्या आगामी भागांमध्ये शालिनीला जयदीप मारण्याचा प्रयत्न करतो असं दाखवलं आहे. ती आरडाओरड करते तेव्हा घरातील सगळे जमा होतात. शालिनी मल्हारला जयदिपविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मल्हार तिचं ऐकून जयदीपच्या कानाखाली मारतो. तसेच त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो. हे बघून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो.
या प्रसंगामुळे मालिकेला वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. बाळाच्या काळजीमुळे जयदीपला वेड लागण्याची पाळी आलीये. आधीसुद्धा बाळाच्या जीवाला धोका आहे अशी चिट्ठी जयदीपला मिळालेली असते. पण सगळ्यांसमोर हे तो सिद्ध करू शकत नाही. मालिकेत हे सगळं शालिनीने घडवून आणलं आहे. आतासुद्धा हा सगळा डाव शालिनीचाच आहे. पण जयदीप घरच्यांसमोर हे सिद्ध करू शकेल का, या सगळ्यानंतर गौरी त्याला समजून घेईल का या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळतील.
सुख म्हणजे काय असतं मालिकेत चालू असलेल्या या ट्रॅक मुळे मालिका टीआरपी मध्ये पाच मध्ये आहे. या मालिकेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. असं असलं तरी सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका पहिल्या क्रमांकावरून थेट पाचव्या क्रमांकावर आली आहे. मालिकेत सध्या गौरीला बाळ झालं आहे. गौरीच्या अपघातानंतर मालिका पहिल्या क्रमांकावर आली होती. या आठवड्यात मालिका 6.2 TVT रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे.