मुंबई, 23 ऑक्टोबर : झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgaath) ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राचा वेगळा चाहता वर्ग आहे. मालिकेतील मुख्य भूमिकेतील कलाकारांचा तर चाहता वर्ग आहेच पण सध्या या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी सीमी…म्हणजे सीमा चौधरी यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.. सीमीच्या ड्रेसिंग स्टाईलची तिच्या बोलण्याच्या स्टाईलने या मालिकेत तिचं वेगळेपण सिद्ध केले आहे. नकारात्मक भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव शीतल क्षीरसागर **(Sheetal Kshirsagar )**आहे. पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणारी सीमी काकू **(Sheetal Kshirsagar biography )**खऱ्या आयुष्यात कशी आहे तिच्याबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. यापूर्वी देखील शीतल क्षीरसागर यांनी झी मराठीच्याच का रे दुरावा या लोकप्रिय मालिकेत देखील त्यांनी विरोधी भूमिका साकारली होती. या मालिकेतील शोभाच्या भूमिकेने त्या महाराष्ट्राच्या घरघरात पोहचल्या.शीतल क्षीरसागर यांना बालपणापासून या क्षेत्राचे आकर्षण होते. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी बॉलिवू़ड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा मासुम हा हिंदी चित्रपट पाहिला होता. त्यावेळी त्यांनी मला ह्या मुलीची भूमिका का नाही दिली? असं आई वडिलांना निरागस भावनेने विचारलं होतं. बालपणापासून अभिनयाची आवड मग त्यांनी नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवातकेली. ही आवड जोपासत त्यांनी पुढे नाटकांतून काम केलं. कॉलेजमध्ये असताना नाट्यस्पर्धा गाजवल्या.वा वाचा : कृत्रिम पायामुळे अभिनेत्रीला सहन करावा लागला मनस्ताप शेवटी CISF चा माफीनामा शीतल क्षीरसागर यांना पहिला चित्रपट मिळाला आणि त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. शीतल यांना 1999 ला आरंभ हा पहिला मराठी सिनेमा मिळाला. त्यानंतर ‘एक होती वादी’ हा अधोरेखित करणारा चित्रपट त्यांच्या वाट्याला आला कारण या चित्रपटातली वादी ही प्रमुख भूमिका तितकीच आव्हानात्मक होती. वादी मूकी असल्याने चित्रपटात शितल यांना एकही संवाद नव्हता. केवळ चेहऱ्यावरील हावभावावरूनच तो अभिनय साकारायचा होता. त्यामुळे ही भूमिका शीतल यांच्यासाठी आव्हानीत्मक होती. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. विशेष म्हणजे शीतल यांच्या एक होती वादी या चित्रपटाला महाराष्ट्र शासनासह तब्बल 53 पुरस्कार मिळाले होते. शीतल यांच्या आयुष्यातील एक उल्लेखनीय चित्रपट म्हणून याचा उल्लेख करता येईल.
शीतल क्षीरसागर या मागील 20 वर्षापासून मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचे त्यांनी सोने केले आहे. मग ती भूमिका नकारत्मक असो की सकारात्मक. अभिनयाच्या जीवावर त्यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतण्याचा प्रयत्न केला आहे. का रे दुरावा, एक होती राजकन्या, आई कुठे काय करते अशा अनेकम मराठी मालिकेतून त्यांनी अभिनयाची जादु दाखवली आहे. सध्या त्यांची सीमी काकुची भूमिका चांगलीच गाजत आहे. वाचा : Radhe Shyam Teaser: प्रभासच्या वाढदिवसाला मेकर्सनी दिलं मोठं गिफ्ट;रिलीज केला… शीतल क्षीरसागर यांनी लग्न केलेले नाही. त्या त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. त्यांचा संपूर्ण परिवार त्यांच्यासोबत आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याचा उपभोग मी घेते असं त्या म्हणतात.

)







