. सुधा चंद्रन यांना झालेल्या त्रासाबद्दल आम्हाला क्षमा करावी. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच नियमानुसार सुरक्षा तपासणीदरम्यान कृत्रिम अवयव काढून तपासणी करणे आवश्यक असते. परंतु महिला सुरक्षा अधिकाऱ्याने सुधा चंद्रन यांच्या बाबतीत हा नियम का लक्षात घेतला नाही, याची चौकशी करण्यात येईल, असे ‘सीआयएसएफ’ने म्हटले आहे.