जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Tu Tevha Tashi : स्वप्निल जोशीनं सांगितलं अभिज्ञा भावेचं 'ते' गुपित

Tu Tevha Tashi : स्वप्निल जोशीनं सांगितलं अभिज्ञा भावेचं 'ते' गुपित

Tu Tevha Tashi : स्वप्निल जोशीनं सांगितलं अभिज्ञा भावेचं 'ते' गुपित

सप्निल जोशी सध्या झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेमध्ये काम करत असून या मालिकेत तो सौरभची भूमिका साकारत आहे. अभिनेता सतत आपल्या सेटवरील भन्नाट गोष्टी शेअर करत असतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 ऑगस्ट: मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे स्वप्निल जोशी (Swapnil Joshi). सप्निल सध्या झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेमध्ये काम करत असून या मालिकेत तो सौरभची भूमिका साकारत आहे. अभिनेता सतत आपल्या सेटवरील भन्नाट गोष्टी शेअर करत असतो. अशातच त्यानं इन्स्टाग्रामवर मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यानं त्याची सहकलाकार अभिनेत्री अभिज्ञा भावेविषयी एक गुपित सांगितलं आहे. अभिनेता स्वप्निल जोशीनं त्याच्या इन्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यानं अभिनेत्री अभिज्ञा भावेविषयी मजेदार गुपित सांगितलं आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की त्यानं अभिज्ञा भावे कशी शिंकते हे प्रेक्षकांना सांगितलं आहे. एवढंच नाही तर स्वप्निलनं तिची नक्कलही करुन दाखवली. अभिज्ञा शिंकताना ‘येस’ असा आवाज करते. हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

News18

स्वप्निल असे अनेक भन्नाट फोटो, व्हिडीओ, मालिकेच्या सेटवरचे मजेदार किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्यामुळे चाहते त्याच्या पोस्टच्या नेहमीच प्रतिक्षेत असतात. त्यानं एकादी पोस्ट शेअर करताच चाहते प्रचंड प्रतिसाद देताना दिसतात. स्वप्निलचा चाहता वर्गही मोठा असल्यानं त्याला नेहमीच भरमसाठ प्रेमही मिळत असतं. हेही वाचा -   Dia Mirza वर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन, शेअर केली EMOTIONAL पोस्ट दरम्यान, मालिकेबाबत सांगायचं तर या मालिकेत स्वप्नील आणि शिल्पा तुळसकर यांची सुंदर केमिस्ट्री दिसून येत आहे. सोबतच या मालिकेत अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि इतर दिग्गज कलाकारसुद्धा आहेत. हे कलाकार सतत सेटवर धम्माल मस्ती करताना दिसून येतात. ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात