मुंबई, 23ऑक्टोबर- अनेकवेळा सोशल मीडियावर बॉलिवूड (Bollywood) कलाकरांचे थ्रोबॅक फोटो (Throwback Photo) व्हायरल होत असतात. त्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. असाच एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो होता अभिनेत्री करिना कपूरचा**(Kareena Kapoor)**. अभिनेत्री करिना कपूर फोटोमध्ये सलमान खान (Salman Khan) आणि बहीण करिश्मा कपूरसोबत होती. मात्र फोटोचं वैशिष्ट्य असं होतं, की यावेळी करिना कपूर केवळ ९ वर्षांची होती. वाटलं ना आश्चर्य? हो हे खरं आहे. चला तर मग जणूं घेऊया या फोटोमागील किस्सा.
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. कारण यामध्ये सलमान खानसोबत एक छोटीशी गोंडस मुलगी होती. ती मुलगी इतर कोणी नसून करिना कपूर होती. विशेष म्हणजे करिना कपूर केवळ ९ वर्षांची होती. आणि ती सलमान खानची मोठी चाहती होती. पहिल्यांदा ९ व्या वर्षी भेटलेल्या या चिमुकलीने नंतर सलमान खानसोबत अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. सलमान खानने अलीकडेच बॉलिवूड डॉट कॉम या वेबसाईटला भेट दिली होती. त्यावेळी त्याला या फोटोबद्दल विचारण्यात आलं होतं. यावेळी सांगताना सलमान खाननं म्हटलं होतं, ‘हा फोटो मला चांगलाच लक्षात आहे. या फोटोमध्ये करिना जेव्हा मला भेटली होती, तेव्हा ती फक्त ९ वर्षांची होती. ती मला भेटायला आली होती. ती माझी चाहती असल्याचं मला समजलं होतं. **(हे वाचा:** ‘ओये ओये गर्ल’ सोनमने बोल्ड सीन देत माजवली होती खळबळ! सध्या जगतेय असं आयुष्य ) सलमानने पुढं सांगितलं, ‘हा फोटो १९९२ मध्ये आलेल्या ‘जागृती’ चित्रपटाच्या सेटवरच आहे. यामध्ये करिश्मा आणि मी मुख्य भूमिकेत होतो. त्यावेळी करिना आपल्या आई आणि बहिणीसोबत मला भेटायला सेटवर आली होती. मी माझ्या मेकअप रूममध्ये थांबलो होतो. आणि तीसुद्धा मला भेटायला तिथे आली होती. ती एका मोठ्या स्टारला पहिल्यासारखं मला पाहात होती. असं सलमान खाननं म्हटलं होतं. सलमान खान आणि करिश्मा कपूर यांचा ‘जागृती’ या चित्रपटाने बंपर ओपनिंग केली होती, मात्र नंतर हा चित्रपट फ्लॉफ ठरला होता. मात्र या चित्रपटाइ सलमान आणि करिना कपूरची भेट घडवून आणली होती. त्यांनतर अभिनेत्री म्हणून करिनाने सलमान खानसोबत काम केलं आहे. **(हे वाचा:** काजोलने पती अजय देवगणबद्दल सांगितले दोन सिक्रेट!वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य ) करिनाने सलमान खानसोबत करिनाने ‘क्यों की’मध्ये काम केलं आहे. या चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली होती. त्यांनतर करिनाने ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात सलमान खानसोबत कामी केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यांनतर आलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे रोकर्ड तोडत तुफान लोकप्रियता मिळवली होती. हा चित्रपट एका फारच संवेदनशील विषयावर आधारित होता. एक छोटीशी पाकिस्तानी मुलगी भारतात येऊन चुकते. आणि त्यांनतर ती सलमान खानला भेटते. सलमान त्याला पाकिस्तानला तिच्या आईपर्यंत पोहोचवण्यासाठी एक माणूस म्हणून जो कष्ट घेतो, ते कौतुकास्पद होते. यावेळी चित्रपटात सलमान खानला मानसिक धैर्य देण्याचं काम करिना करत असते. त्यामुळे तिच्याही भूमिकेचं कौतुक झालं होतं. सध्या करिना स्वतः तैमूर आणि जेह या दोन मुलांची आई आहे. आणि ती पती सैफसोबत उत्तम वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.