मुंबई, 23 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये अभिनय क्षेत्राप्रमाणे संगीत क्षेत्रातही माफिया असल्याचा खुलासा गायक सोनू निगमने (Sonu Nigam) केला. यानंतर त्याने थेट टी-सीरिजचा मालक भूषण कुमारचं (Bhushan Kumar) नाव घेत त्याच्यावर निशाणा साधला. सोनू निगमने त्याला मरीना कुंवरच्या (Marina Kuwar) व्हिडीओची धमकी दिली. सोनू निगमने थेट व्हिडीओतून धमकी दिल्यानंतर आता मरीना कुंवरनेही ट्वीट केलं आहे.
मरीना कुंवरच्या या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. मरीनाने आपण डिप्रेशनमध्ये असल्याचं सांगितलं आहे. शिवाय या समस्येचा काहीच मार्ग नाही असंही ती म्हणाली.
मरिनाने ट्वीट केलं आहे, "जेव्हा तुमच्या आयुष्यात अशा घटना घडतात, ज्या तुम्हाला कधीच नको असतात आणि अशा घटनांमुळे जेव्हा तुमचं आयुष्य बदलं, तेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. या घटना तुमच्या जीवनावर किती वाईटरित्या परिणाम करतात, हे कुणीच जाणू शकत नाही. कधी-कधी आपण हरतो आणि मग आपण आपल्या आयुष्यासह सर्वकाही संपवतो. मला खूप उदास वाटतं आहे"
💔🙏💔 pic.twitter.com/nHbEi8MFJG
— Marina kuwar (@marinakuwar) June 22, 2020
मरीना कुंवर जी एक मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री आहे. मरीना जिंदगी 'जिंदगी तुमसे', 'जग्गू दादा', 'शपथ', 'सीआईडी' आणि 'आहट' सारख्या सीरिअल्समध्ये दिसून आली होती. 2018 साली ती सर्वात जास्त चर्चेत आली जेव्हा तिने दिग्दर्शक साजिद खान आणि भूषण कुमारवर आपलं शोषण केल्याचा आरोप केला होता. #MeToo मोहिमेअंतर्गत मरीनाने आजतकला दिलेल्या एका मुलाखतीत आरोप केले होते की, भूषण कुमारने व्हिडीओत काम देण्याच्या नावाखाली आपल्या घरी बोलावलं आणि गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला होता.
हे वाचा - बॉलिवूड स्ट्रगलबद्दल काय म्हणाला होता सुशांत, अभिनेत्रीनं शेअर केले स्क्रीनशॉट
गायक सोनू निगमने मरिनाचा तो व्हिडीओ यूट्युबवर टाकण्याची धमकी भूषण कुमारला दिली आहे.
View this post on Instagram
सोनू निगमने या व्हिडीओत म्हटलं आहे, "भूषण कुमार आता तर तुझं नाव मला घ्यावंच लागेल आणि आता तू 'तू'च्या लायकीचाच आहेस. तू चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला आहेस. ती वेळ विसरलास का जेव्हा तू माझ्या घरी आला होतास... जेव्हा तू मला म्हणाला होतास, भावा माझा अल्बम कर... भावा दिवाना कर... भावा मला सहाराश्रींना भेटवून दे... स्मिता ठाकरेंना भेटवून दे... बाळासाहेब ठाकरेंना भेटवून दे... मला अबू सालेमपासून वाचव...माहिती आहे ना हे? मी तुला सांगतो आता तू माझ्या नादाला लागू नकोस"
हे वाचा - गायिका नेहा कक्कर म्हणाली- 'काळजी करू नका, मी मरणार नाही फक्त...'
"मरीना कुंवर लक्षात आहे ना? ती काय बोलली आणि का बॅकआऊट झाली? हे मला माहिती नाही, मीडियाला माहिती आहे. माफिया असंच काम करतो. तिचा व्हिडीओ अजूनही माझ्याकडे आहे. जर आता तू माझ्याशी पंगा घेतलास तर तिचा व्हिडीओ मी माझ्या यूट्युब चॅनेलवर टाकेन. माझ्या नादी लागू नकोस", असं सोनू निगम म्हणाला.
संपादन - प्रिया लाड