जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Urmila Nimbalkar: प्रेग्नंसीदरम्यान उर्मिलाने 'त्या' कटू प्रसंगाला दिलं तोंड; आठवणी शेअर करताना अश्रू अनावर

Urmila Nimbalkar: प्रेग्नंसीदरम्यान उर्मिलाने 'त्या' कटू प्रसंगाला दिलं तोंड; आठवणी शेअर करताना अश्रू अनावर

Urmila Nimbalkar: प्रेग्नंसीदरम्यान उर्मिलाने 'त्या' कटू प्रसंगाला दिलं तोंड; आठवणी शेअर करताना अश्रू अनावर

उर्मिला निंबाळकरने एवढ्या कठीण काळात सुद्धा हार न मानता भक्कमपणे उभं राहून आलेल्या परिस्थितीचा सामना केला. तिच्या नव्या व्हिडिओवर सध्या चाहते तिला बराच सपोर्ट करताना दिसत आहेत.

  • -MIN READ Assam, Mizoram
  • Last Updated :

मुंबई 01 ऑगस्ट: उर्मिला निंबाळकर ही अभिनेत्री आणि मराठमोळी युट्युबर बरीच प्रसिद्ध होताना दिसत आहे. आपलं गोड हसू आणि नेहमीच प्रसन्न मनाने आजपर्यंत तिने बरीच मोठी युट्युब फॅमेली कमावली आहे. उर्मिला (urmila nimbalkar brother ips vaibhav nimbalkar) तिच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या अनेक सुंदर गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते. उर्मिला प्रेग्नन्ट असताना तिच्या कुटुंबाने एका मोठ्या प्रसंगाला तोंड दिल्याचं समोर आलं आहे. आणि हा प्रसंग म्हणजे उर्मिलाच्या भावाचा झालेला अपघात. उर्मिलाचा भाऊ म्हणजेच आयपीएस वैभव निंबाळकर हा आसाम आणि मिझोरम राज्यांमध्ये झालेल्या संघर्षात जखमी झाला होता. मागच्या वर्षी 26 जुलै रोजी आसाम आणि मिझोरम राज्यांच्या सीमेवर झालेल्या बेछूट गोळीबारात वैभव यांच्या पायाला गोळी लागली आणि त्या धुमश्चक्रीत ते गंभीर जखमी झाले. उर्मिलाच्या परिवाराने या प्रसंगाला तोंड कसं दिलं याचं वर्णन तिच्या कुटुंबीयांनी सविस्तरपणे तिच्या नव्या युट्युब व्हिडिओमध्ये केलं आहे. आज या प्रसंगाला एक वर्ष झाल्यावर उर्मिला याबद्दल बोलताना व्हिडिओमध्ये म्हणते, “आज एक वर्षानी कठीण प्रसंगाला सुद्धा सेलिब्रेट करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. मला व्हिडिओ बनवावा आणि बनवू नये असं दोन्ही वाटत होतं. मात्र या द्विधा मनस्थिती न अडकता मी व्हिडिओ बनवायचं ठरवलं. पण त्यादिवशी असे अनेकजण होते जे देशासाठी कर्तव्य बजावताना शहीद झाले. माझा भाऊ जरी यातून देवाच्या कृपेने सुरक्षित बचावला असला तरी जे शहीद झाले त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं कारण त्यांना सुद्धा स्वतःचं कुटुंब आहे, किंवा आज तो प्रसंग आठवून त्याबद्दल ते सुद्धा व्यक्त झाले असते. नुसतं हा प्रसंग शेअर करणं फार सोपं आहे पण ज्या व्यक्तीवर प्रसंग बेततो त्याची नेमकी अवस्था कशी असते हे कोणालाच समजणार नाही.  याबाबतीत मी भाग्यवान आहे की वैभवसारखा भाऊ मला मिळाला. त्याने खूप शांतपणे आणि खंबीर राहून तो प्रसंग निभावून नेला. आणि एवढंच नाही तर त्याला झालेली जखम, त्याच्या वेदनाही त्याने निभावून नेल्या. त्या प्रसंगात ज्या व्यक्ती आपल्याला सोडून गेल्या त्यांच्या कुटुंबियांना खूप बळ मिळूदे.”

तसंच त्यादरम्यान उर्मिलाची डिलिव्हरी सुद्धा होणार होती. तेव्हा गर्भारपणाच्या अशा काळात उर्मिलासाठी अशा प्रसंगाला तोंड देणं किती अवघड होतं हे सांगताना तिचे अश्रू अनावर झाल्याचं सुद्धा दिसून आलं आहे. उर्मिलाच्या भावाने दाखवलेली हिंमत आणि कर्तव्यासाठी दाखवलेलं शौर्य याचं बरंच कौतुक होताना दिसत आहे. हे ही वाचा-  Ankush Chaudhri: सूर्या आणि डॅडी समोरासमोर; नजरेत आग असलेला अंकुशचा लुक चर्चेत तिला आणि तिच्या कुटुंबियांना सध्या सगळेच चाहते सपोर्ट करताना दिसत आहेत. उर्मिला म्हणा किंवा अगदी तिच्या घरातील सगळ्यांचीच चाहत्यांशी चांगली ओळख आहे. तिचं कुटुंबीय हे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जगताना दिसत असतात. मात्र अशा कठीण काळात सुद्धा धीर खचू न देता त्यांनी सगळं कसं निभावून नेलं ही कथा खरंच डोळ्यात पाणी आणणारी आहे अशी प्रतिक्रिया समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात