जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ankush Chaudhri: सूर्या आणि डॅडी समोरासमोर; नजरेत आग असलेला अंकुशचा लुक चर्चेत

Ankush Chaudhri: सूर्या आणि डॅडी समोरासमोर; नजरेत आग असलेला अंकुशचा लुक चर्चेत

Ankush Chaudhri: सूर्या आणि डॅडी समोरासमोर; नजरेत आग असलेला अंकुशचा लुक चर्चेत

डॅडी आणि सूर्या यांची अनोखी गोष्ट असलेला दगडी चाळ सिनेमाचा दुसरा भाग बराच धमाकेदार असणार हे अंकुश चौधरीच्या नव्या पोस्टरमुळे दिसून येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 01 ऑगस्ट: मराठीत सध्या अनेक नवनव्या सिनेमांची मांदियाळी येताना दिसत आहे. अनेक सिनेमांचे सिक्वेल रिलीज होऊन धमाका करण्यासाठी सज्ज आहेत आणि प्रेक्षकांमध्ये सुद्धा त्या सिनेमांबद्दल बरीच उत्सुकता दिसत आहे. असाच एक सिनेमा म्हणजे दगडी चाळ 2. सध्या सिनेमाबद्दल एक एक पैलू उलगडताना दिसत आहेत. अशातच आज अंकुश चौधरीच्या (ankush chaudhari dagdi chawl 2) भूमिकेचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. दगडी चाळ भाग एकमध्ये डॅडी आणि सूर्या यांचं हे अनोखं कथानक प्रेक्षकांना भलतंच आवडलं होतं. सूर्यकांत हा अनावधानाने डॅडी म्हणजेच अरुण गवळी यांच्या संपर्कात येतो आणि त्याचं आयुष्य कसं बदलतं हे यामध्ये बघायला मिळालं होतं. मात्र सिनेमाच्या दुसऱ्या भागात अंकुश चौधरी एका वेगळ्याच रूपात दिसून येणार आहे. त्याच्या पोस्टरवर सुद्धा I Hate You Daddy असं लिहिलेलं असल्याने अनेकजण याने चक्रवताना दिसत आहेत. सिनेमाच्या पोस्टरची कॅप्शन सुद्धा लक्ष वेधून घेत आहे. “जे घडून गेलं ते पुसता नाही येणार…पण आता जे घडणार आहे ते कोणालाही थांबवता नाही येणार… नजरेत धार, अंगात रग आणि हृदयात आग… तो येतोय पुन्हा…” अंकुशच्या हा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना आणि चाहत्यांना भलताच आवडला असून सिनेमाचा एकूण लुक इन्टरेस्टिंग दिसत आहे. तसच या पोस्टरनंतर ट्रेलरची सुद्धा उत्सुकता वाढताना दिसत आहे. या सिनेमात डॅडींचं पात्र साकारणारे अभिनेते मकरंद देशपांडे यांचा एक खास टिझर प्रदर्शित झाला होता. ‘चुकीला माफी नाही’ या गाजलेल्या डायलॉगने ओळख मिळवलेल्या डॅडींच्या पात्राचं निराळं रूप दाखवणारा टिझर सुद्धा प्रेक्षकांना बराच आवडला होता.

जाहिरात

अरुण गवळी आणि दगडी चाळ अशा अनेक गोष्टींबद्दल सामान्यांना बरीच माहिती आहे. अरुण गवळी यांचा सदरा आणि टोपीतला अंदाज, त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्त्व, त्यांना आदराने डॅडी अशी दिलेली पदवी, त्यांचा बाणा अशा अनेक गोष्टी पहिल्या भागात साफ दिसून आल्या होत्या. आता दुसऱ्या भागात सूर्या आणि डॅडी समोरासमोर येऊन ठाकणार का असा प्रश्न पोस्टर बघून समोर येताना दिसत आहे. अंकुश सध्या वर्क फ्रंटवर वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. एकीकडे त्याच्या नव्या ‘ऑटोग्राफ’ सिनेमाची घोषणा झाली असून येत्या काळात शाहीर साबळे यांच्या आयुष्यावरील जीवनपटात सुद्धा तो दिसून येणार आहे. दगडी चाळ सिनेमाचा दुसरा भाग येत्या 18 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात