जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Urmila Nimbalkar: मल्टिटॅलेंटेड उर्मिला निंबाळकरने चक्क तयार केली साडी; तिचा रेट्रो लुक बघाच!

Urmila Nimbalkar: मल्टिटॅलेंटेड उर्मिला निंबाळकरने चक्क तयार केली साडी; तिचा रेट्रो लुक बघाच!

Urmila Nimbalkar: मल्टिटॅलेंटेड उर्मिला निंबाळकरने चक्क तयार केली साडी; तिचा रेट्रो लुक बघाच!

(Urmila Nimbalkar) उर्मिला निंबाळकर तिच्या प्रसन्न चेहऱ्याने व्हिडिओची सुरवात करत कायमच चाहत्यांचं मन जिंकत आली आहे. तिच्या एका नव्या व्हिडिओची झलक तिने नुकतीच शेअर केली असून या प्रोमोमध्ये ती भलतीच सुंदर दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 1 जुलै: मराठीमधल्या काही मोजक्या युट्युबर्स पैकी एक म्हणजे (Urmila Nimbalkar) उर्मिला निंबाळकर. उर्मिला गेली अनेक वर्ष नेटाने तिचं (Urmila Nimbalkar Youtube channel) युट्युब चॅनल चालवत आहे. आठवड्यात दर शुक्रवारी तिचे विडिओ बघायला तिची फॅन मंडळी प्रचंड आतुर असतात. उर्मिला ही एक यशस्वी अभिनेत्री असून तिने स्वतःचं युट्युब चॅनल सुरु करत मराठी कन्टेन्ट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. उर्मिलाच्या एका नव्या व्हिडिओची खास झलक समोर आलीये ज्यात ती कमाल ब्लॅक अँड व्हाईट व्हाईट लूकमध्ये दिसत आहे. उर्मिला ही फॅशन, लाइफस्टाइल या विषयांवर विडिओ बनवत असते. ती युट्युबसोबत इन्स्टाग्रामवर सुद्धा (Urmila Nimbalkar Instagram) प्रचंड ऍक्टिव्ह असते. तिच्याकडे साकारतमकतेचा एक स्तोत्र म्हणून पाहिलं जातं. तिच्या व्हिडिओमध्ये तिच्या फॅशन लुकमध्ये ती कायमच वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. असाच एक आगळा वेगळा विडिओ ती लवकरच शेअर करणार आहे. तिच्या या खास व्हिडिओमध्ये तिने साडी स्वतः बनवली आहे. आता एरवी बाजारात मिळणाऱ्या साड्या तर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. पण कधी त्याचा रंग हवा तसा नसतो, कधी डिजाईन तर कधी आपल्या मनासारखी साडी शोधणं हे देवाला शोधण्यापेक्षा सुद्धा कठीण होऊन जातं. म्हणूनच बजेटमध्ये आपल्या आवडीची, आपल्या कम्फर्टप्रमाणे साडी कशी निवडावी याबद्दल व्यवस्थित माहिती देणारा तिचा हा विडिओ लवकरच चॅनलवर येणार आहे. या व्हिडिओची एक खास झलक तिने शेअर केली असून यात तिने अगदी अप्रतिम असा रेट्रो लुक तयार केला आहे.

जाहिरात

ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात जसे टिपिकल सुंदर साडीमधले लुक असत तसाच लुक तिने रिक्रिएट केला आहे. त्यासोबत काळी छत्री घेऊन ‘प्यार हुआ एकरार हुआ’ गाण्यावर उर्मिला मस्त डान्स करताना आणि आपल्या अदा दाखवताना दिसत आहे. साडी नक्की कोणत्या रंगाची आहे हे तिने अजून रिव्हील केलं नाहीये पण तिचा हा रेट्रो लुक खूपच पसंत केला जातोय. हे ही वाचा-  वेडेपणाला हद्द असते! ‘आई कुठे…’ मालिकेच्या सेटवर संजना शेखरचा क्रेझी डान्स

 उर्मिला काही काळापूर्वी आई झाली असून तिच्या मुलाचं नाव अथांग आहे. उर्मिला अथांगचे सुद्धा बरेच फोटो आणि विडिओ पोस्ट करत असते. या न्यू मॉमने आई झाल्यापासूनचे आपले अनेक अनुभव शेअर केले आहेत. तिची प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्ट ही वाचण्यासारखी असते. अगदी साध्या शब्दात, सोप्या भाषेत आणि अशक्य सकारत्मक ऊर्जेने उर्मिला कायमच नवनवे विडिओ बनवत असते. ती कायमच एक हसतमुख राहणारी मराठमोळी युट्युबर म्हणून सगळ्यांना माहित आहे. तिचा तिच्या फॅन मंडळींशी असलेला कनेक्टच तिच्या यशाचं मोठं रहस्य आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात