Home /News /entertainment /

वेडेपणाला हद्द असते! 'आई कुठे...' मालिकेच्या सेटवर संजना शेखरचा क्रेझी डान्स

वेडेपणाला हद्द असते! 'आई कुठे...' मालिकेच्या सेटवर संजना शेखरचा क्रेझी डान्स

आई कुठे काय करते मालिकेतील शेखर सर्वांनाच माहिती असेल तर मालिकेत तर तो धम्माल उडवून देतो. शेखरबरोबर आता संजना देखील वेडी झाल्याचं पाहायला मिळतंय. संजना आणि शेअर यांचा क्रेझी डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

  मुंबई, 01जुलै: आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) मालिकेत सध्या इंटरेस्टिंग ट्रॅक सुरू आहे. ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली आहे ती म्हणजे मालिकेतील कलाकारांमुळे. मालिकेत कलाकारांचं केलेल्या उत्तम कास्टिंगमुळे मालिका सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचली आणि प्रेक्षकांना मालिकेतील प्रत्येक पात्र आपलीशी वाटली. कलाकार प्रत्येक सीनसाठी प्रचंड मेहनत घेत असतात. मात्र सीन झाल्यावर त्यांची खरी धम्माल सुरू होते. आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर एकाहून एक अतरंगी कलाकार आहेत. ते सतत त्यांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. नुकताच अभिनेत्री रुपाली भोसले ( Rupali Bhosale ) म्हणजेच संजनानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. वेडेपणालाही हद्द असते मात्र संजना आणि शेखर ( Sanjana Shekhar Reels Video) यांच्या वेडेपणाला कोणतीही हद्द राहिलेली नाही. हा धम्माल व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मालिकेचं शुटींग रात्री उशिरा पर्यंत सुरू असतं. तेव्हा कलाकार दमतात, बोर होतात , कंटाळा येतो तेव्हा एनर्जी बुस्ट करण्यासाठी रुपाली आणि टिम काय करते याविषयीही रुपालीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, तिनं म्हटलंय,  'वेडेपणाला हद्द असते... नाही कोणतीच हद्द नसते. आम्ही आमच्या स्टेप्स नाचून ट्रेडिंग रिल्स तयार करत असतो. ही माणसं क्रेझी आणि पण तितकीच गोड आहेत. आम्ही प्रत्येक फ्रेममध्ये सुंदर दिसावं यासाठी कष्ट घेणारा आमचा डिओपी आणि मयुर खांडके जो येतो आणि सगळ्यांची मन जिंकतो.  खरंतर तर सिरियस सीन्सनंतर स्ट्रेस बस्टर महत्त्वाचा आहे आणि म्हणून आम्ही असं नाचतो की जसं कोणी आम्हाला पाहत नाही. पण खरंतर आम्हाला सगळे पाहत असतात'.
  हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: देशमुख कुटुंबावर नवं संकट; यशवर लागणार खुनाचा आरोप? अभिनेत्री रुपाली भोसलेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये संजना शेखर आणि मालिकेचे डिओपी नाचताना दिसत आहेत. शेअर आणि डिओपींचा नाच पाहून दोन मिनिटं संजना देखील थांबून राहते. शेखरचा डान्स पाहून तर नेटकऱ्यांना देखील हसू आवरलेलं नाही. व्हिडीओ कमेंट्स करत एका युझरनं म्हटलंय, 'संजना आणि शेखर कार्टून आहेत'. तर दुसऱ्या युझरनं 'झक्कास' म्हणत हार्ट इमोजी शेअर केलेत.  आई कुठे काय करते मालिकेतील सर्वचं कलाकार सीन नंतर एकत्र येऊन मज्जा करताना दिसतात. त्यांचे अनेक धम्माल रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या