मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज खलनायकाच्या नातीचं ऐतिहासिक मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज खलनायकाच्या नातीचं ऐतिहासिक मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण

सोनी मराठी वाहिनीवरील “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” या मालिकेतून कृष्णा राजशेखरने मालिका विश्वात पदार्पण केलं आहे. कृष्णा राजशेखर ही मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी व एका लोकप्रिय खलनायताची नात आहे हे फार कमी जणांना माहित आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” या मालिकेतून कृष्णा राजशेखरने मालिका विश्वात पदार्पण केलं आहे. कृष्णा राजशेखर ही मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी व एका लोकप्रिय खलनायताची नात आहे हे फार कमी जणांना माहित आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” या मालिकेतून कृष्णा राजशेखरने मालिका विश्वात पदार्पण केलं आहे. कृष्णा राजशेखर ही मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी व एका लोकप्रिय खलनायताची नात आहे हे फार कमी जणांना माहित आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 16 नोव्हेंबर- सोनी मराठी वाहिनीवरील “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” या मालिकेतून कृष्णा राजशेखरने (krushna rajshekhar )मालिका विश्वात पदार्पण केलं आहे. कृष्णा राजशेखर या मालिकेत छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी “जानकीबाई राणीसाहेबांची” भूमिका बजावत आहे. कृष्णा राजशेखर ही मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी व एका लोकप्रिय खलनायताची नात (father swapnil and grandfather rajshekhar )आहे हे फार कमी जणांना माहित आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहे.

स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही कृष्णा राजशेखरची पहिली टीव्ही मालिका 

स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही कृष्णा राजशेखरची पहिली टीव्ही मालिका आहे. याअगोदर कृष्णा ने हिमालयाची सावली या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. कृष्णाने कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले असून अभिनयाचे धडे देखील गिरवले आहेत. वडील स्वप्नील राजशेखर यांच्या पाऊलवार पाऊल ठेवत कृष्णाने अभिनयात करियर करण्याचे ठरवले आहे.

वाचा : Rajkumar Rao-Patralekhaa च्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाले हरियाणाचे मुख्यमंत्री!

स्वप्नील राजशेखर यांची मुलगी

स्वप्नील राजशेखर यांनी देखील मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका सृष्टीतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. स्वराज्यरक्षक संभाजी, राजा शिवछत्रपती, कुलस्वामिनी, स्वप्नांच्या पलीकडले, अजूनही चांद रात आहे, चार दिवस सासूचे, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, धिंगाणा, एक अलबेला मधून महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.

मराठी चित्रपटातून अनेक खलनायक सशक्तपणे रंगवणारे अभिनेते “राजशेखर

स्वप्नील राजशेखर यांचे वडील आणि कृष्णाचे आजोबा म्हणजे मराठी चित्रपटातून अनेक खलनायक सशक्तपणे रंगवणारे अभिनेते “राजशेखर”. जनार्दन गणपत भूतकर हे त्यांचे मूळ नाव होते. त्यांचा जन्म गडहिंग्लज तालुक्यात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. राजशेखर यांचे हस्ताक्षर सुरेख असल्यामुळे ते भालजींकडे पटकथा लिहिण्याचे काम करत होते. 1958 साली भालजी पेंढारकरांच्या ‘आकाशगंगा’ या चित्रपटात त्यांनी इन्स्पेक्टरची छोटी भूमिका रंगवली. हीच त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात होय. त्यानंतर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते भालजींच्या कंपनीत दाखल झाले. त्यानंतर ‘मोहित्यांची मंजुळा’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली.

वाचा : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या 4 नातेवाईकांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

‘साधी माणसं’ या भालजींच्याच चित्रपटात त्यांनी फक्कडराव ड्रायव्हरची भूमिका केली तसेच, या चित्रपटाचे साहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. ही भूमिका लोकप्रिय झाली आणि भालजींनी जनार्दन भूतकर यांचे नाव ‘राजशेखर’ ठेवले आणि राजशेखर यांचा खलनायक म्हणून प्रवास सुरू झाला.

‘मल्हारी मार्तंड’, ‘बारा वर्ष सहा महिने तीन दिवस’, ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’, ‘धर्मकन्या’, ‘लाखात अशी देखणी’ (‘जोतिबाचा नवस’, ‘वारणेचा वाघ’ अशा अनेक रौप्यमहोत्सवी चित्रपटात त्यांनी खलनायक म्हणून स्वतंत्र ठसा उमटवला.

आचा आजोबा आणि वडिल यांच्या पाऊलवर पाऊल ठेवत कृष्णाने देखील अभिनया क्षेत्रात पहिले पाऊल ठेवलं आहे. कृष्णा सोशल मीडियावर देखीलि चांगलीच सक्रिय असते. तिचे काही फोटो देखील तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment