मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबावर पुन्हा दुःखाचं सावट; कार अपघातात ४ नातेवाईकांचा दुर्दैवी मृत्यू

सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबावर पुन्हा दुःखाचं सावट; कार अपघातात ४ नातेवाईकांचा दुर्दैवी मृत्यू

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या  (Sushant Singh Rajput)  कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 16 नोव्हेंबर-  बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या  (Sushant Singh Rajput)  कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बिहारमधील  (Bihar)  लखीसराय जिल्ह्यात मंगळवारी सकाळी जमुई जिल्ह्यातील खैरा पोलीस स्टेशन हद्दीतील भंडारा गावातील एका कुटुंबातील सहा जणांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातातील सहा बळींपैकी चार सुशांत सिंग राजपूतचे नातेवाईक होते. या अपघातात सुशांत राजपूतचा भावोजी आणि हरियाणा कॅडरचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश सिंग यांचे चार नातेवाईक ठार झाले आहेत.

ओमप्रकाश सिंह यांच्या बहिणीचा अंत्यसंस्कार केल्यानंतर, सुशांतच्या बहिणीचा पती आणि त्यांची दोन मुले आणि मुलीसह एकूण १० लोक सुमो व्हिक्टामधून प्रवास करत होते. जे अंत्यसंस्कार करून पाटणाहून त्यांच्या घरी परतत होते. लखीसरायजवळ त्यांच्या कारला अपघात झाला ज्यात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोन जणांना जमुईला तर दोन जणांना पाटणा येथे रेफर करण्यात आले आहे.

लखीसराय जिल्ह्यातील हलसी पोलीस स्टेशन अंतर्गत शेखपुरा रोड येथील पिपराजवळ ही घटना घडली. जिथे सुमो विक्टा आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात विकटामधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये लालजीत सिंग, नेमानी सिंग, रामचंद्र सिंग, बेबी सिंग, अनिता सिंग आणि प्रीतम सिंग यांचा समावेश आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक हे खैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून ते सर्व आपापसात नातेवाईक आहेत. तर चालक प्रीतम सिंग हा सोनपे येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हे वाचा:Bigg Boss 15: राकेश बापटच्या जाण्याने दुखी शमिताला विशाल देणार दगा; VIDEO)

जखमींमध्ये बालमुकुंद सिंग आणि दिलखुश सिंग हे चौहानडीह येथील रहिवासी आहेत. तर इतर दोन जखमींना पाटणा येथे रेफर करण्यात आले आहे. त्यांची नावे बाल्मिकी सिंग आणि टोनू सिंग अशी आहेत. त्यांच्यात बाप-मुलाचं नातेसंबंध होत. तसेच ते खैरा क्षेत्र, नवदिहा येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाइकांची अवस्था फारच वाईट झाली आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Sushant sing rajput