मुंबई, 16 नोव्हेंबर- अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) 11 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अखेर लग्नबंधनात अडकले. 15 नोव्हेंबरला या दोघांनी चंदीगडमध्ये थाटामाटात लग्न (Wedding) केलं. फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत होता. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांचा विवाह सोहळा अतिशय खाजगी ठेवला होता. दरम्यान, सोमवारी रात्री चंदीगडमध्ये एका भव्य रिसेप्शनचेही आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही हजेरी लावली होती.
चंडीगढ़ में बॉलीवुड के प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव और पत्रलेखा के विवाह समारोह में शामिल होकर वर-वधू को आशीर्वाद और सफल वैवाहिक जीवन की शुभकामनाएं दीं। pic.twitter.com/eNLf8xy8GR
— Manohar Lal (@mlkhattar) November 15, 2021
सीएम मनोहर लाल खट्टर यांनी दोघांनाही सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर राजकुमार आणि पत्रलेखासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. त्या दोघांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, "बॉलिवुडचे प्रसिद्ध अभिनेते राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या चंदीगड येथे विवाह सोहळ्याला उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा आणि यशस्वी वैवाहिक जीवयासाठी शुभेच्छा. "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, की राजकुमार राव हा मूळचा गुरुग्रामचा रहिवासी आहे.
या फोटोमध्ये पत्रलेखाने गोल्डन कलरची सुंदर सिल्क साडी परिधान केली होती. तसेच गळ्यात भरदार दागिनेही घातले होते. तिने सिंदूर आणि बिंदीसह आपला लूक पूर्ण केला होता. यासोबतच तिने साडीवर शालही घेतली होती. त्याचवेळी राजकुमार रावने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. राजकुमार राव आणि पत्रलेखा एकत्र खूपच छान दिसत होते.
(हे वाचा:सलमान खान नाही अटेंड करणार कतरिना-विकिचं लग्न? काय आहे सत्य)
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी सोमवारी त्यांच्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. राजकुमार रावने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'अखेर 11 वर्षांच्या प्रेम, मैत्री, रोमान्स आणि मस्तीनंतर... मी माझ्या सर्व गोष्टींसह लग्न केले आहे. माझी सोबती, माझी सर्वात चांगली मैत्रीण, माझे कुटुंब. आज मला तुझं नवरा म्हणणं यापेक्षा मोठा आनंद नाही. कायमचे आणि त्यानंतरसुद्धा...'त्याचवेळी पत्रलेखानेही लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. राजकुमार राव गोल्डन कलरच्या शेरवानी आणि पत्रलेखा रेड लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होते.त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Rajkumar rao