• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'लागीर झालं जी' फेम शीतलीला झाली कोरोनाची लागण

'लागीर झालं जी' फेम शीतलीला झाली कोरोनाची लागण

‘लागीर झालं जी’(lagir zal ji) फेम ‘शीतली’(shitali) म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकरला(shivani baokar) कोरोनाची लागण (corona positive)झाल्याची माहिती स्वतः तिनं आपल्या इन्स्टाग्रामद्वारे दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 एप्रिल- कोरोनाचा (coronavirus)विळखा दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. महारष्ट्रातील (maharashtra)कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघून सरकारने लॉकडाऊनचा (lockdown)निर्णय घेतला आहे. तरीसुद्धा रुग्णांच्या संख्येत भरचं पडत आहे. इतकचं नव्हे मनोरंजनसृष्टीलासुद्धा कोरोनाने पछाडलं आहे. अनेक कलाकरांना कोरोनाची लागण झाली आहे. दररोज हा आकडा वाढतच चालला आहे. नुकताच ‘लागीर झालं जी ’(lagir zal ji) फेम ‘शीतली’ (shitali) म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकरला (shivani baokar) कोरोनाची लागण (corona positive)झाल्याची माहिती समोर आली आहे.
  शिवानीनं नुकताच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. याच पोस्टद्वारे तिने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. शिवानी म्हणते, ‘ सर्व काळजी आणि खबरदारी घेऊनही दुर्दैवाने माझी covid 19 चाचणी पॉजीटीव आली आहे. सर्व प्रोटोकॉलचे पालन करत मी माझा डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे औषधोपचार करत आहे. मी सर्वांना विनंती करत की अतिरिक्त काळजी घ्या आणि आवश्यक असल्यासचं घराबाहेर पडा. सुरक्षित राहा आणि निरोगी राहा भेटू लवकरचं’. या पोस्टद्वारे शिवानीने आपल्या चाहत्यांना माहिती दिलि आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रेणुका शहाणेला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. आश्चर्ययाची बाब म्हणजे चक्क 11 दिवसांपूर्वी रेणुकाने कोरोनाची लस घेतली होती. (अवश्य वाचा:‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप) महाराष्ट्र आणि कोरोना सध्या कोरोनाची दुसरी लाट असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. आणि दुखद बाब म्हणजे सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे ही परस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महारष्ट्र सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यात चित्रपट आणि मालिकांच्या चित्रिकरणावर सुद्धा बंदी आहे. त्यामुळे कित्येक चित्रीकरण महाराष्ट्रा बाहेर हलविण्यात आले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: