मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप

‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप

“राजकारण ही कीड कोविडपेक्षा भयाण”; मराठी अभिनेत्री राजकिय पक्षांवर संतापली

“राजकारण ही कीड कोविडपेक्षा भयाण”; मराठी अभिनेत्री राजकिय पक्षांवर संतापली

“राजकारण ही कीड कोविडपेक्षा भयाण”; मराठी अभिनेत्री राजकिय पक्षांवर संतापली

मुंबई 19 एप्रिल: कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. या वाढत्या संक्रमाणामुळं देशवासीयांचं आयुष्य विस्कळीत झालं आहे. लोक बेरोजगार झाले आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी लसींचा तुटवडा जाणवत आहे. शिवाय आर्थिक समस्या हे एक मोठंच संकट देशावर कोसळलं आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही राजकीय नेते केवळ राजकारण करण्यात व्यस्त आहे. त्यामुळं अशा नेत्यांवर अन् त्यांच्या पक्षांवर अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिनं संताप व्यक्त केला आहे. (Politics of India) राजकारण ही कोरोनापेक्षा भयानक कीड आहे अशी टीका तिनं केली आहे.

तेजस्विनीनं इन्स्टाग्रामद्वारे सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं देशात सुरु असलेल्या राजकारणावर जोरदार टीका केली. तिनं “सगळ्यात मोठी “कीड” जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे “राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या “कीड”पासून बचाव करता आला तर बघा! ..अवघड आहे सगळंच…काळजी घ्या.” अशा रोखठोक शब्दात आपलं मत व्यक्त केलं आहे. तिची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा - ‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप

कोरोनानं घेतले 1 लाख 75 हजार 649 बळी

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 इतका झाला आहे. यापैकी आजपर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 रुग्ण कोरोनावर मात करून बरे देखील झाले आहेत. मात्र, अजूनही देशात 16 लाख 79 हजार 740 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आणि त्यामध्ये रोज नव्या रुग्णांची भर पडत आहेत. त्यासोबतच देशात आजपर्यंत कोरोनामुळे तब्बल 1 लाख 75 हजार 649 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारला गांभीर्याने पावलं उचलण्याची अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Pandemic, Politics, Tejaswini pandit