Home /News /entertainment /

मालिका संपताच चिन्मय मांडलेकरचा 'जीव झाला येडापिसा'; निरोप घेताना केली भावुक पोस्ट

मालिका संपताच चिन्मय मांडलेकरचा 'जीव झाला येडापिसा'; निरोप घेताना केली भावुक पोस्ट

'जीव झाला येडापिसा' मालिका बंद होतं असल्यानं भावुक होतं अभिनेता आणि मालिकेचा लेखक चिन्मय मांडलेकरनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. ती पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

  मुंबई, 07 एप्रिल : कित्येक मराठी नव्या मालिकांचं छोट्या पडद्यावर आगमन होतं आहे. तर कित्येक सुप्रसिद्ध मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. काही दिवसांपूर्वी मराठीतील प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारी मालिका 'जीव झाला येडापिसा'नं (Jiv jhala yedapisa) प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील मुख्य जोडी असणारी शिवा आणि सिद्धी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. मालिका बंद होतं असल्यानं भावुक होतं अभिनेता आणि मालिकेचा लेखक चिन्मय मांडलेकरने (chinmay mandalekar) सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. ती पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. 3 एप्रिलला ही मालिका बंद झाली. त्यानंतर चिन्मय अतिशय भावुक झाला होता. कारणही तसंचं होतं. 2019 ला ही मालिका पडद्यावर झळकली होती. तेव्हापासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर आपली पकड निर्माण केली होती. जिद्दी शिवा, शिस्तप्रिय आणि सुशिक्षित सिद्धी यांच्या नात्यातील बंध उलगडणारी ही मालिका होती. सुरुवातीला एकमेकांच्या कट्टर शत्रूसारखे वागणारे शिवा आणि सिद्धी एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात आणि आपल्या प्रेमाला ढाल बनवून प्रत्येक संकटांना कसं सामोरं जातात. हे या मालिकेतून दाखवण्यात आलं होतं. शिवा आणि सिद्धीची ती उंदीर मांजराची भांडणं आणि ती अफलातून केमिस्ट्री प्रेक्षकांना जास्तच पसंत पडली.
  यामुळे मालिकेला मिळालेलं प्रेम आणि आता घ्यावा लागणारा निरोप याची सांगड घालत अभिनेता लेखक चिन्मय मांडलेकरने ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये चिन्मय म्हणतो, "535 भागांचा टप्पा पूर्ण करून जीव झाला येडापिसाचा प्रवास आज थांबतो आहे. माझ्या काळजाच्या खूप जवळची ही मालिका. पुराशी, कोविडशी लढली. कलेकलेनं वाढली. 5 भाषांमध्ये या मालिकेच्या आवृत्या निघाल्या, त्याही यशस्वी झाल्या. आज सगळा प्रवास थांबेल. कधी थांबणार? पेक्षा का थांबलात? हा प्रश्न कधीही गोड वाटतो." हे वाचा - अमृता खानविलकरनं चक्क लंडनमध्ये वडापाव आणि शेवपुरीवर मारला ताव.... "सर्व कलाकारांचं, तंत्रज्ञानाचं अभिनंदन आणि आभार. विनोद लवेकर, निखील शेठ, कल्याणी पठारे, दीपा तेली, विशाल, दत्ता संग्राम, तुषार जोशी प्राची तुम्ही जे दिलंत त्यासाठी भरपूर प्रेम आणि आभार आणि मी तुम्हाला जो त्रास दिला त्याबद्दल क्षमा. खूप खूप आभार. दीपक राज्याध्यक्ष तू दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनापासून आभार. शिवा, सिद्धी, जलवा, सोनी, आत्याबाई, सरकार आणि सर्व रसिकांचे आभार" अशा शब्दांत चिन्मयनं आपलं प्रेम आपला आभार व्यक्त केला आहे. हे वाचा - शशांक केतकरची बहीणही मालिकेत दिसणार; न्यूयॉर्कमध्ये घेतलेत अभिनयाचे धडे या मालिकेतील शिवा आणि सिद्धी फक्त ही मुख्य जोडीच नव्हे तर जलवा, सोनी, आत्याबाई, सरकार या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यामुळे प्रेक्षकही या मालिकेचा निरोप घेताना भावुक झाले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या