दीक्षाचा भाऊ म्हणजेच अभिनेता शशांक केतकर सुद्धा सध्या झी टीव्हीवरील ’पाहिले न मी तुला’ मालिकेत व्यग्र आहे. शशांक या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहे. एका मुख्य अभिनेत्यानं नकारात्मक पात्र साकारणं हे फार कठीण काम आहे. मात्र शशांकनं ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं वठवलं आहे. याआधी सुद्धा मराठी मालिकांमध्ये भावंडांच्या जोड्या दिसून आल्या आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे कित्येक वर्षांपासून मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये कार्यरत आहे. नुकतीच तिची लहान बहिण गौतमी देशपांडेनं सुद्धा अभिनयात पदार्पण केलं आहे. ती सध्या झी टीव्ही वरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत काम करत आहे. तसेच अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि खुशबू तावडे सुद्धा अभिनय क्षेत्रात आहेत. (हे वाचा: शिवाजी महाराजांवर येतेय नवी मालिका; हा अभिनेता साकारणार छत्रपतींची भूमिका) दीक्षा केतकर बद्दल बोलायचं झालं तर दीक्षानं अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. दीक्षानं न्यूयॉर्कमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. ती बालपणापासून अभिनय करत आहे. याआधी तिनं अगदी बालवयात नाटकांमध्ये काम केलं आहे. आता दीक्षा आता मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस कशी उतरते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.